जालना जिल्ह्यातील युवकाचा खून : चौघा संशयतांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

जालना जिल्ह्यातील युवकाचा खून : चौघा संशयतांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

नआधुनिक केसरी न्यूज

देऊळगाव राजा : जालना जिल्ह्यातील एका युवकाचा मृतदेह देऊळगाव राजा जालना मार्गावरील एका शेतात मिळाल्याने खळबळ उडाली आहे. सदर युवकाचा खून झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या उघडकीस आले असून पोलिसांनी देऊळगाव राजा येथील संशयित चौघा युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सदर युवकाच्या खुनात ताब्यात घेतलेल्या युवकांचा सहभाग आहे का याबद्दल पोलीस तपास करीत आहे.
 याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार जालना जिल्ह्यातील सागर दिगंबर डुकरे वय ३० रा.किन्ही ताठे ता.जाफ्राबाद याचा मृतदेह देऊळगाव राजा जालना मार्गावरील अजय शिवरकर यांच्या ढाब्या जवळ शनिवारी मध्यरात्री मिळून आला. संशयितरित्या मिळून आलेल्या सदर युवकाचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून देऊळगाव राजा येथील चौघा संशयित युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान फिर्यादी यांचे भाऊ सागर दिगंबर डुकरे यास अक्षय कुकडे व त्याचे साथीदारानी अज्ञात कारणावरून संगणमत करून डोक्यावर व पाठीमागून कशाने तरी जीवे मारण्याचा उद्देशाने वार करून ठार मारले व खून केला आहे. याबाबत गजानन दिगंबर डुकरे रा. किन्ही ताठे तालुका जाफराबाद यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला असून चौघा संशयित युवकांना ताब्यात घेतले आहे. तर मोठ्या आरोपी अक्षय कुकडे हा फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. देऊळगाव राजा तालुक्यात जालना जिल्ह्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवकाचा खून झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित युवकांच्या तपासा अंती संबंधित खुनातील आरोपीचा सुगावा लागणार आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री महामुनी यांनी घटनास्थळी भेट दिली असून  उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार आशिष रोही, एपीआय शिंदे व पीएसआय भरत चिरडे तपास करीत आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

तुकूम येथे भीषण अपघात,आमदार किशोर जोरगेवार यांची घटनास्थळी पाहणी ; जखमींची रुग्णालयात जाऊन भेट तुकूम येथे भीषण अपघात,आमदार किशोर जोरगेवार यांची घटनास्थळी पाहणी ; जखमींची रुग्णालयात जाऊन भेट
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : हायवा चालकाला फिट आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहनाने रस्त्याकडेला असलेल्या नागरिकांना चिरडले. या...
पाऊले चालती पंढरीची वाट ; श्रींच्या पालखीचे पंढरपूर वारीकरीता प्रस्थान..!
धुळ्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेश बदलत बनावट बियाणं केलं जप्त; जवळपास 20 लाखांचं बनावट बियाणं जप्त
जालना जिल्ह्यातील युवकाचा खून : चौघा संशयतांना पोलिसांनी घेतले ताब्यात 
ओडिशा राज्यातील वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची चंद्रपूर वन अकादमीला भेट
चंद्रपूरात 'संडे ऑन सायकल' अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत क्रुझर पर्यटकांकरिता चंद्रपूर ते मोहर्ली बससेवा उद्घाटन सोहळा संपन्न..!