खेळत असलेल्या सहा वर्षीय चिमुकली वर बिबट्याने केला हल्ला..!

आधुनिक केसरी न्यूज
गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या स्थानिक गोठणगाव येथील एका सहा वर्षीय मुलीवर (ता. ३०) रोजी रात्री आठच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्यात जखमी झालेल्या मुलीचे नाव युकत मारोती निखारे (वय ६ वर्ष) असे आहे .या संदर्भात माहिती देण्यात आली की युकत ही चिमुकली रात्री आठच्या सुमारास अंगणात उभी असताना अचानक बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केले. दरम्यान तिचा किंचाळण्याचा आवाज आल्याने तिच्या घरचे व शेजारील लोक धावून आल्याने मोठा अनर्थ टळला. तिच्या मान आणि डोक्यावर बिबट्याची नखे खोलवर गेल्याने बराच रक्तस्त्राव झाला आहे. लागलीच तिला उपचारासाठी अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. ती सध्या सुखरूप असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे मागील सहा महिन्यांपूर्वी सुद्धा अंगणात खेळत असलेल्या एका मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिला काही अंतरावर फरफटत नेले होते. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. ही घटना ताजी असतांनाच (दिनांक.३०) रोजी रात्री पुन्हा एका सहा वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. लोक रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना घाबरत आहेत. वनविभागाने त्या धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करून त्याला जेरबंद करावा आणि जखमी मुलीला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News

Comment List