हरवलेल्या 11 वर्षीय मुलाचा 12 तासांत सुगम शोध; तेलंगणामधून सुरक्षित परतवला

हरवलेल्या 11 वर्षीय मुलाचा 12 तासांत सुगम शोध; तेलंगणामधून सुरक्षित परतवला

आधुनिक केसरी न्यूज

लक्ष्मीकांत मुंडे 

किनवट :  पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 172/2025, कलम 137(2) भा.दं.सं. (BNS) अंतर्गत हरविलेल्या मुलाचा शोध घेण्यात पोलीस प्रशासनाला यश आले असून, केवळ 12 तासांत सदर मुलगा तेलंगणा राज्यातून शोधून काढण्यात आला आहे. हरविलेल्या मुलाचे नाव राजेश उर्फ सोनू रामचंद्र कटारे (वय 11 वर्षे, रा. बोधडी खुर्द, ता. किनवट) असे आहे. सदर घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर माननीय पोलीस निरीक्षक देविदास चोपडे  यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली तात्काळ शोधमोहीम राबविण्यात आली.

या तपासकार्याची जबाबदारी पोलीस हेडकॉन्स्टेबल सिद्धार्थ वाघमारे व  प्रदीप आत्राम यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती व तत्पर कारवाईच्या आधारे तेलंगणा राज्यात तपास सुरू ठेवत संबंधित मुलास शोधून काढले.शेवटी, सदर मुलास त्याचे वडील श्री. रामचंद्र शिवराम कटारे यांच्याकडे सुखरूप ताब्यात देण्यात आले असून, संपूर्ण कार्यवाहीत पोलिसांनी तत्परता व कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण सादर केले आहे.या कामगिरीबद्दल नागरिकांतून पोलीस दलाचे कौतुक करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अखेर  चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसची अधिकृत गटनोंदणी झाली रे बाप्पा..! अखेर  चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसची अधिकृत गटनोंदणी झाली रे बाप्पा..!
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांच्या वर्चस्वाच्य लढाईत सबंध महाराष्ट्रात गाजलेली चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक आता महापौर पदाच्या...
येत्या 5 वर्षात विदर्भाचा सर्वांगीण विकास करु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अबुजमाड कारवाईत शहीद पोलीस कमांडो दीपक चिन्ना मडावी यांना पोलीस मुख्यालयात शासकीय मानवंदना
सन 2026-27 च्या जिल्हा नियोजनासाठी 658 कोटींची अतिरिक्त मागणी
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज..!
चंद्रपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. गोपाल मुंधडा यांचे निधन
महापौर मुनगंटीवार गटाचा, उपमहापौर व गटनेतेपद जोरगेवार गटाकडे