बोगस ठिबक घोटाळ्याने धसकावले कृषी विभागाला

चार प्रभारी सहायकांना 'घरचा रस्ता', कोटींचा गैरव्यवहार उघड

बोगस ठिबक घोटाळ्याने धसकावले कृषी विभागाला

आधुनिक केसरी न्यूज

मुखेड : तालुक्यातील सूक्ष्म जलसिंचन योजनेच्या नावाखाली ‘ठिबक’ थाप मांडून शेतकऱ्यांच्या जीवावर गदा आणणाऱ्या चौघा प्रभारी कृषी पर्यवेक्षकांची अखेर गच्छंती झाली आहे. लातूरच्या विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी अनुदानाच्या नावाखाली कोटींचा गोरगरिबांचा पैसा हडप करणाऱ्या एक लोहा, एक मुदखेड या तालुक्यातले व चौघांना निलंबनाची नोटीस झळकावली आहे. रोहिणी गोविंदराव पवार कृषी पर्यवेक्षक लोहा एलसीबीने अटक केली आहे. एक मुदखेड चा कृषी पर्यवेक्षक ज्योतिबा पवार हे देखील निलंबित आहेत

मुखेड तालुक्याचे चारही कृषी सहाय्यक फरार राजू पाटणकर, संतोष दबडे, साईनाथ कचकलवार आणि सुनील बनसोडे या चौघांनी ठिबक व तुषार साहित्य विक्रेत्यांशी संगनमत करून बोगस बिलं, खोटी पावती आणि बनावट बॅच नंबर टाकत सरकारचा गल्ला साफ केला. ही मंडळी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतेय, असं दाखवून डिजिटल लॉटरीमध्ये निवडलेल्यांच्या नावावर लाखोंच्या रकमा वळती करत होती. २०२१ ते २०२३ या कालावधीत तब्बल ८० शेतकऱ्यांच्या नावावर हा गोरखधंदा सुरू होता. महाडीबीटीवर साहित्य खरेदीची बनावट पावती अपलोड करून, त्यावरील तपासणी प्रक्रियाही कागदावरच उरकली जात होती. विभागीय आणि जिल्हास्तरावरही या गडबडीत हात मिळवणी झाल्याचे संकेत आहेत.आ. जितेश अंतापूरकर यांनी विधानसभेत थेट तारांकित प्रश्न विचारून हा भूसंपादित घोटाळा उघड केला. त्यानंतर खळबळ उडाली आणि चौकशी समितीने तपास हाती घेताच कोटींचा गैरव्यवहार उघड झाला. त्याच्या पार्श्वभूमीवर कृषी आयुक्तांच्या आदेशाने ही चौघांची हकालपट्टी झाली. पण गंमत अशी, की चार सहायक निलंबित झाल्यानंतरही तालुका कृषी अधिकारी विकास नारळीकर म्हणतात, “माझ्या कार्यालयात काही आदेश आलेले नाहीत!” — मग ह्यांना गोड झोप लागलेली होती की काय? कार्यवाही झाली, चौकशी झाली आणि साहेब म्हणतात ‘माहिती नाही’ — ही कुठली कारभारशैली?
हा घोटाळा कुठवर पोहोचला, यामागे आणखी कोण कोण आहे, आणि प्रशासनाच्या वरच्या थरापर्यंत ही लाट पोहोचली का, याची चौकशी होणे गरजेचे आहे. अन्यथा ‘ठिबक’च्या नावावर पुन्हा एखादा घोटाळा उभा राहायला वेळ लागणार नाही!

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

‘विकासाच्या अजेंड्यात गडचिरोली अग्रक्रमावर’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘विकासाच्या अजेंड्यात गडचिरोली अग्रक्रमावर’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आधुनिक केसरी न्यूज गडचिरोली, दि. ६ : “माझ्या विकासाच्या अजेंड्यावर गडचिरोली जिल्हा अग्रक्रमांकावर असल्याने शासनाच्या सर्व विभागांनी याची जाणीव ठेवावी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगड सीमेवरील दुर्गम कवंडे गावात
बोगस ठिबक घोटाळ्याने धसकावले कृषी विभागाला
स्वयंनिर्माण फाउंडेशन अंतर्गत १०० झाडांचे वृक्षारोपन..!
वाळु चोरी उघड करणार्‍या पत्रकावर हल्ला; लोखंडी रॉडने मानहाण, चौघांवर गुन्हा
शिक्षकांचा उपक्रम 'एक पेड  धरती माँ के नाम' ; पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते वृक्षारोपण 
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री  श्रीलीला हिने घेतले साईचे दर्शन