चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक 10 जुलैला 11 जुलैला लागणार निकाल
आजपासून नामनिर्देशनासह होणार सुरुवात
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर, 5/6/2025 कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यासह झालेल्या नौकर भरती प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक अखेर 10 जुलैला होणार असून 11 जुलैला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सर्वच पक्षांच्या आमदार, खासदारांनी या बँकेच्या निवडणुकीला प्रतिष्ठेचे केले असल्यामुळे या बँकेवर कोणाचं वर्चस्व राहणार हे आता 11 जुलै ला स्पष्ट होईल. आज पासून नामनिर्देशनासह ही निवडणूक प्रक्रिया सुरुवात झाली असून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे आता संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
तब्बल १३ वर्षांनी होणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला. आजपासून ( दि. ५ जुलै) नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ११ जुलैला मतमोजणी झाल्यानंतर बँकेला नवे संचालक मंडळ मिळणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी चांगलीच कम्बर कसली आहे.मेगा नोकरभरती प्रकरणाने राज्यभरात गाजलेल्या या बँकेच्या निवडणुकीत पहिल्यादांच मोठ्या प्रमाणात राजकीय क्षेत्रातील दिग्गज सक्रिय झाले आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.
विद्यमान संचालक मंडळाची निवडणूक सन २०१२ मध्ये झाली होती. संचालक मंडळाचा कार्यकाळा पाच वर्षांचा असतो. मात्र, न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यामुळे निवडणुक होऊ शकली नाही. या काळात बँक अनेक घोटाळ्यांनी गाजली. दरम्यान, न्यायालयाने सहा महिन्यांत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला आणि विद्यमान संचालकांचे अधिकार गोठविले. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेला वेग आला. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (प्रभारी) चंद्रशेखर बोदड अधिसूचना जारी करणार आहे. त्यानुसार पाच ते ११ जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल. १२ जूनला छाननी होईल. १३ ते २७ जून यादरम्यान नामनिर्देशन पत्र मागे घेतले जातील. उमेदवारांची अंतिम यादी ३० जूनला प्रसिद्ध केली जाईल. १० जुलै ला मतदान आणि ११ जुलैला मतमोजणी होईल. त्यानंतर नवे अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया निवडून आलेले संचालक पार पाडतील. २१ संचालकांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत १४ संचालक 'अ' गटातून निवडणून येतील. गट 'ब' मधील एक आणि दोन मधून प्रत्येकी एक. याशिवाय अनुसूचित जाती, जमाती , इतर मागासवर्गीय, विमुक्त भटक्या जमाती, मागास प्रवर्ग आणि महिला राखीव या गटातून प्रत्येकी एक एक जण बँकेत संचालक म्हणून जाणार आहेत.
खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेस नेते आमदार विजय वडेड्डीवार, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, आमदार किशोर जोरगेवार असे दिगग्ज या निवडणुकीत मतदार आहेत. यातील काही जण निवडणुकीत उभे राहण्याची शक्यता आहे. प्रचंड चुरशीच्या ठरणाऱ्या या निवडणुकीत माजी पालकमंत्री भाजपचे वजनदार नेते सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया असे राजकारणातील दिगग्ज सुद्धा पडद्यामागून बऱ्याच घडामोडीत सहभागी होतील. जिल्हा बँकेवर सत्ता मिळवण्यासाठी विधानसभा, महानगर पालिका निवडणुकीप्रमाणे युती आघाडीसाठी त्यांनी प्रयत्न चालविले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List