तहसील कार्यालयातुन जप्त केलेल्या ट्रॅक्टर पळवला ; तहसील कार्यालयासह वाहनांची सुरक्षा वाऱ्यावर
आधुनिक केसरी न्यूज
लक्ष्मीकांत मुंडे
माहूर तालुक्यातील गोकुळ येथून वाळू चोरी करत असलेला ट्रॅक्टर जीवाची पर्वा न करता अर्ध्या रात्री पैनगंगा नदी पात्रातून जप्त करून कार्यालयाच्या आवारात लावलेला ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी दि 3 रोजी रात्री लंपास करून वाळू रस्त्यावर फेकून देत पुन्हा तहसील कार्यालयाच्या रस्त्यावरील सह्याद्री जिनिंगच्या समोर रस्त्यावर आणून बेवारस सोडून दिला तो ट्रॅक्टर सकाळी नायब तहसीलदार कैलास जेठे व कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून पुन्हा कार्यालयात लावल्याची घटना दि 4 रोजी सकाळी 9.00 वाजता घडल्याने चोरांनी दोन दिवस आधीच पदभार स्वीकारलेले तहसीलदार मुंगाजी काकडे यांना सलामी दिल्याची जोरदार चर्चा होत आहे
माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांची बदली झाल्याने वाळू तस्करांनी वाळू चोरी सुरू केल्याच्या वार्ता कानावर येताच नायब तहसीलदार कैलास जेठे आणि कर्मचाऱ्यांनी गोकुळ येथून पैनगंगा नदी पत्रातून वाळू चोरी करत असलेला ट्रॅक्टर दोन दिवसाआधी जीव धोक्यात घालून पकडून आणत तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केला होता या ठिकाणी बाळू चोरी करणारे सर्व वाहने जप्त करून उभी करण्यात आलेली आहेत तहसील कार्यालयाचा मुख्य प्रवेशद्वार हा 24 तास उघडाच असतो तसेच अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक भिंतिचा अभाव आणि सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तहसील कार्यालयाचे आवार बेवारस असल्यासारखेच आहे
याचाच फायदा घेत अज्ञात वाळू तस्करांनी सदरील ट्रॅक्टर रात्री अकरा वाजता चे सुमारास सुरक्षा रक्षक नसल्याच्या फायदा घेत मुख्य रस्त्यावर आणून बौद्ध भूमी परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सार्वजनिक शौचालय जवळ त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली मध्ये असलेली वाळू फेकून देत एक टायर पंचर झाल्याने घाटाखाली न नेता पुन्हा तहसील कार्यालया कडे नेत असताना रस्त्यावरील सह्याद्री जिनिंग प्रेसिंग येथे समोरील दुसरा टायर पंचर झाल्याने अज्ञात चोरट्याने तो ट्रॅक्टर तिथेच सोडून देत पळ काढला
तहसीलदार मुंगाजी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार कैलास जेठे मंडळ अधिकारी साळसुंदर तलाठी चंद्रकांत बाबर यांनी सकाळी सदरील ट्रॅक्टरचा पंचनामा करून तो पुन्हा तहसीलचा आवारात नेऊन लावला असून नवीन तहसीलदार मुंगाजी काकडे यांनी पदभार स्वीकारताच चोरांनी त्यांना सलामी दिल्याने अज्ञात चोरावर मोक्का अंतर्गत कारवाई होईल का याकडे माहूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List