बळवंत वाचनालय येथे महिला बचत गटाचे भव्य प्रदर्शन अन् ग्राहकांना..!
आधुनिक केसरी न्यूज
राजरत्न भोजने
छत्रपती संभाजीनगर : स्वयंनिर्माण फाउंडेशन आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनीशीएटिव्ह ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन सोमवार दि. 26 व 27 रोजी वेळ सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यत बळवंत वाचनालय औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसाचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाप्रमुख शिवसेना माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्वयंनिर्मण फौंडेशनच्या अध्यक्षा प्रिती शेगोकार,यांच्या उपस्थिती पार पडले. जिल्हाप्रमुख शिवसेना माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शनात एकूण २५ स्टॉल थाटले आहेत. यामध्ये उमंग महिला बचत गट, शिवकृपा महिला बचत गट, श्रावस्ती महिला बचत गट, मैत्री महिला बचत गटाची उपस्थिती आहे. महिला बचत गटानी स्वतः बनवलेले खाद्यपदार्थ, डायफ्रूट, ड्रेस मटेरियल, ज्वेलरी, खाद्यपदार्थ, साड्या, कॉस्मेटिक मटेरियल,पापड, उन्हाळी खाद्यपदार्थ, इ.स्टॉल मध्ये लावलेले आहेत. तरी सर्व महिला ग्राहकांनी यामध्ये उस्फुर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन स्वयंनिर्मान फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रिती शेगोकार यांनी केले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List