माजी सरपंचाचा कुजलेला मृतदेह आढळला; लोणार तालुक्यात खळबळ२५ दिवसांपासून होते गायब हत्या झाल्याच्या संशय..!

माजी सरपंचाचा कुजलेला मृतदेह आढळला; लोणार तालुक्यात खळबळ२५ दिवसांपासून होते गायब हत्या झाल्याच्या संशय..!

आधुनिक केसरी न्यूज

 प्रणव वराडे 

लोणार : तालुक्यात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. एका माजी सरपंचाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. लोणार शहरातील हिरडव रोडवर हा मृतदेह सापडला..अशोक आबाजी सोनूने (६०, रा. वढव, ता.लोणार) यांचा हा मृतदेह असल्याची ओळख पटली आहे..अशोक सोनुने वढव गावचे माजी सरपंच असून गेल्या १४ मे पासून ते गायब होते... अशोक सोनुने गायब असल्याची तक्रार लोणार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती.  दरम्यान काल सायंकाळी शहरातील हिरडव रोडवर एक कुजलेल्या आणि दुर्गंधी सुटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. तो मृतदेह अशोक सोनुने यांचा असल्याची ओळख पटली.. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.. मृतदेह अतिशय छिन्नविच्छन्न अवस्थेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी विविध अँगलने तपासाला सुरुवात केली आहे, हा मर्डर असल्याचा काहीसा संशय असल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे...

_________________________

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मोखाड्यात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने कृषीमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन. मोखाड्यात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने कृषीमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन.
आधुनिक केसरी न्यूज तेजस रोकडे  मोखाडा : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन जंगली रमी खेळताना चा...
उद्धव ठाकरेंचा वाढदिवस मांजरीत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा 
उत्सवांच्या काळामध्ये डीजे चा दणदणाट सहन केला जाणार नाही; पोलीस अधीक्षक संदीप घुगेंची मंडळांना तंबी
रेल्वे च्या अपुऱ्या कामाबाबत 'जनसुराज्य' चे समित कदम यांनी घेतली केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट दिले निवेदन
कीर्तन महोत्सव समितीतर्फे जेष्ठ नागरिक विजयकुमार गोखले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना पुणे शहर च्या वतीने निषेध आंदोलन. 
आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाचा मयुरेश कोळी याचा डंका ; भूतानमध्ये पटकावले दोन रौप्यपदक