उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना भोजनदान; शिवसैनिकांचा सेवाभाव
आधुनिक केसरी न्यूज
वरोडा : शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज २७ जुलै रोज गुरुवारला वरोडा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात *सामाजिक सेवेचा अनोखा कार्यक्रम* राबविण्यात आला. पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी 'आनंदवनातील' मूकबधिर व अनाथ दिव्यांग अशा जवळपास ४५० विद्यार्थ्यांसाठी भोजनदान व मिठाई वाटपाचे आयोजन केले होते.
या विद्यार्थ्यांच्या समवेत उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त केकही कापण्यात आला.
पक्ष परंपरेप्रमाणे शिवसैनिकांनी नेत्यांचा वाढदिवस "सेवा ही खरी शिवपूजा" या भावनेतून साजरा केला. आनंदवनमधील विशेष विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट व गोडधोड वाटून त्यांच्याशी आनंदाचा क्षण सामायिक केला. "नेता आपल्यासाठी, आपण समाजासाठी" हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
युवा सेनेचे जिल्हा समन्वयक मनीष जेठाणी यांच्या नेतृत्वाखाली नंदूभाऊ पडाल, पंकज नाशिककर, वैभव डहाणे, घनश्याम आस्वले, नंदलाल टेमृडे, लक्ष्मण ठेंगणे यांचेसह अनेक कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले.
*शिवसैनिकांनी घेतली आनंदवनचे विकास आमटे यांची भेट.*
शिवसेना गट दरवर्षी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला रक्तदान शिबिर, अनाथाश्रम सेवा, पर्यावरण संवर्धन अशा सामाजिक जबाबदारीच्या कार्यक्रमांना प्राधान्य देत असतात .
*"ठाकरे साहेबांनी शिवसेना केवळ राजकीय पक्ष नसून समाजसेवेचे मोठे मंच बनवले आहे. आजचा दिवस त्यांच्या विचारांचा आदर्श उतरवणारा ठरला."* असे विचार शिवसैनिकांनी याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी *"जय भवानी, जय शिवाजी!"* या घोषणांनी वातावरण भारावून गेले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List