भाजपात नेमकं चाललय तरी काय ? बंटी भांगडिया यांच्या बॅनर वर मुनगंटीवार यांच्या फोटोला स्थान नाही.

भाजपात नेमकं चाललय तरी काय ? बंटी भांगडिया यांच्या बॅनर वर मुनगंटीवार यांच्या फोटोला स्थान नाही.

आधुनिक केसरी न्यूज

 चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात दमदार प्रवेश करणारे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचा 19 जुलै रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरामध्ये सर्वत्र त्यांचे बॅनर मोठ्या प्रमाणात झळकत आहेत. परंतु या बॅनरवर भाजपाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी हेवीवेट मंत्री म्हणून परिचित असणारे सुधीर मुनगंटीवार यांच्या फोटोला मात्र स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपामधील अंतर्गत गटबाजी चांगलीच उफाळून तर आलेली नाही ना? जिल्ह्याच्या राजकारणात बंटी भांगडिया यांच्या निमित्ताने राजकीय समीकरण वेगळे वळण तर घेणार नाही ना? अशी चर्चा आता शहरात सर्वत्र रंगायला लागली आहे. 

वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय नेते जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री अशोक उईके, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार आणि भाजप नेते रविंद्र शिंदे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांचेही फोटो आहेत. तर काही बॅनरवर भाजपाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोटूवार, प्रकाश देवतळे, अशोक जीवतोडे, आवेश पठाण, आशिष देवतळे, संजय खाटिक यांचेही फोटो आहेत. परंतु सुधीर मुनगंटीवार यांच्या फोटोला मात्र कोणत्याही बॅनर मध्ये स्थान देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे हे सर्व बॅनर नेमके कोणी लावले आणि या बॅनरवर मुनगंटीवार याचा फोटो का नाही याबाबत मात्र आता शहरात सर्वत्र चांगल्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला अंतर्गत गटबाजी चा प्रवास महानगरपालिकेच्या निवडणुका समोर उभ्या टाकल्या आहेत तरीसुद्धा ही गटबाजी न शमता दिवसागणिक आणखीन वाढताना दिसत आहे. त्यामुळे या सगळ्यांचा परिणाम येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर तर होणार नाही ना? आणि याचा फायदा काँग्रेस तर घेणार नाही ना? हे पाहणे आता औत्सुकचे ठरणार आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशामुळे या यशाचे शिल्पकार असलेले बंटी भांगडिया येणाऱ्या काळात एकूणच जिल्ह्याच्या राजकारणात सक्रियपणे उतरण्याच्या तयारीत असल्याचे चित्र त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकावरून दिसत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची कोल्हापूर येथे बदली तर नवे अतिरिक्त आयुक्त म्हणून राहुल रोकडे नियुक्त अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची कोल्हापूर येथे बदली तर नवे अतिरिक्त आयुक्त म्हणून राहुल रोकडे नियुक्त
आधुनिक केसरी न्यूज  सुधीर गोखले सांगली : आज सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त पदाचा खांदे पालट झाला. सध्याचे...
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी गावपातळीवरील कार्यकर्ते सक्रिय ; आरक्षणाकडे लागल्या सर्वांच्या नजरा
अज्ञात व्यक्तींनी रवींद्र शिंदे यांच्या फोटोला फासले काळे
भाजपात नेमकं चाललय तरी काय ? बंटी भांगडिया यांच्या बॅनर वर मुनगंटीवार यांच्या फोटोला स्थान नाही.
रत्नपाल जाधव यांच्या कडून पत्रकारांच्या एस.टी.प्रवास सवलतीत सुधारणा होणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 
मिरजेमध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारणीस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता;  लिंगायत समाज बांधवांकडून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा सत्कार
गोदावरी खोऱ्यातील प्रकल्प बंदी उठवावी : आमदार काशिनाथ दाते