अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची कोल्हापूर येथे बदली तर नवे अतिरिक्त आयुक्त म्हणून राहुल रोकडे नियुक्त
आधुनिक केसरी न्यूज
सुधीर गोखले
सांगली : आज सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त पदाचा खांदे पालट झाला. सध्याचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची कोल्हापूर महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त पदावर बदली झाली तर तेथील राहुल रोकडे यांची पदोन्नती वर सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर बदली झाली. मात्र काल रात्री अचानक झालेल्या या बदली आदेशामुळे अनेक तर्क वितरकांना उधाण आले. मात्र राहुल रोकडे हे सांगली मिरज आणि कुपवाड च्या उपायुक्त पदी काम केलेले अनुभवी व्यक्ती मत्व असल्याने सध्या प्रशासन काळात त्यांच्या अनुभवाचा चांगला फायदा प्रशासनाला होऊ शकतो.
आज अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहृदय निरोप दिला आणि भविष्यातील त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी काही आठवणींना उजाळा दिला तर आयुक्त कार्यालयातील कर्मचारी वृषाली अभ्यंकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज झालेल्या निरोप समारंभ कार्यक्रमामध्ये स्वागत आणि प्रास्ताविक सहा आयुक्त नकुल जकाते यांनी केले उपायुक्त अश्विनी पाटील, विजया यादव यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना पुषगुच्छ देऊन निरोप दिला. यावेळी अग्निशमन विभागाचे सुनील माळी सहा आयुक्त अनिस मुल्ला पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद, सहा आयुक्त सचिन सागावकर यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List