अज्ञात व्यक्तींनी रवींद्र शिंदे यांच्या फोटोला फासले काळे

भाजपा प्रवेशानंतर त्यांच्याविरुद्ध उफाळून आला असंतोष

अज्ञात व्यक्तींनी रवींद्र शिंदे यांच्या फोटोला फासले काळे

आधुनिक केसरी न्यूज

वरोडा : शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या कृतीमुळे  शिवसैनिकात असंतोष पसरला आहे. रवींद्र शिंदे यांचे वरोडा येथील शहीद डाहूले स्मारक चौकात शिवालय नामक जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेर भिंतीवर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य तैलचित्र लावण्यात आले असून त्याच्या बाजूला जिल्हाप्रमुख म्हणून रवींद्र शिंदे यांचाही फोटो आहे. आज 16 जुलै रोज गुरुवारला  सकाळी रवींद्र शिंदे यांच्या फोटोला काळा रंग फासून त्याखाली गद्दार लिहिले असल्याचे निदर्शनास आले. शहरात काल शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख नेमणे असून त्यासाठी दहा ते पंचवीस लाख रुपये द्यावे लागेल. यासाठी राऊत नामक व्यक्तीशी संपर्क करावा अशा आशयाचे वादग्रस्त फलक लावण्यात आले होते. या घटनेची ही प्रतिक्रिया तर नव्हे ना अशी चर्चा सुरू आहे.एक मात्र खरे की शहरात झालेल्या या दोन प्रकारच्या घटनेमुळे पुढील काही दिवसात राजकीय वातावरणात मात्र बरीच उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात अग्रणी असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी रवींद्र शिंदे यांची अविरोध निवड झाली होती. ते काँग्रेस प्रणित पॅनल कडून अविरोध निवडून आल्याचे बोलल्या जात असताना आगामी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून रवींद्र शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्याबाबत निर्माण झालेला असंतोष हा उफाळून आलेला आहे. त्याचीच परिणीती त्यांच्या फोटोला काळे फासण्यात झाली असावी अशी चर्चा आहे. रवींद्र शिंदे यांच्या भाजपा प्रवेश नंतर राजकारण मात्र बरेच तापले आहे. 

 काळे फासणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी  आपली प्रतिक्रिया या कृतीतून व्यक्त केली केल्याचे बोलल्या जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्ती विरोधात तपास सुरू केल्या असल्याचे कळते.फोटोला काळे फासणाऱ्या अज्ञात व्यक्तींची कृती मात्र लोकशाही विरोधी असल्याचे प्रतिक्रिया नागरिकाकडून व्यक्त होत आहे. या घटनेनंतर कार्यालयाबाहेर भिंतीवर असलेले हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य तैलचित्र काढून त्या ठिकाणी स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट च्या विविध योजनांची माहिती देणारे तैलचित्र लावण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची कोल्हापूर येथे बदली तर नवे अतिरिक्त आयुक्त म्हणून राहुल रोकडे नियुक्त अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची कोल्हापूर येथे बदली तर नवे अतिरिक्त आयुक्त म्हणून राहुल रोकडे नियुक्त
आधुनिक केसरी न्यूज  सुधीर गोखले सांगली : आज सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त पदाचा खांदे पालट झाला. सध्याचे...
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी गावपातळीवरील कार्यकर्ते सक्रिय ; आरक्षणाकडे लागल्या सर्वांच्या नजरा
अज्ञात व्यक्तींनी रवींद्र शिंदे यांच्या फोटोला फासले काळे
भाजपात नेमकं चाललय तरी काय ? बंटी भांगडिया यांच्या बॅनर वर मुनगंटीवार यांच्या फोटोला स्थान नाही.
रत्नपाल जाधव यांच्या कडून पत्रकारांच्या एस.टी.प्रवास सवलतीत सुधारणा होणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 
मिरजेमध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारणीस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता;  लिंगायत समाज बांधवांकडून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा सत्कार
गोदावरी खोऱ्यातील प्रकल्प बंदी उठवावी : आमदार काशिनाथ दाते