मिरजेमध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारणीस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता; लिंगायत समाज बांधवांकडून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा सत्कार
आधुनिक केसरी न्यूज
सुधीर गोखले
सांगली : मिरज शहरातील जगद्ज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा चबूतऱ्यासह बसविण्यासाठी अंतिम मंजुरी दिल्याबद्दल जिल्हाअधिकारी मा.अशोक काकडे साहेब यांचा लिंगायत समाजाकडुन सत्कार करण्यात आला. माजी पालकमंत्री आ.जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने आणि माजी स्थायी समिती सभापती संगीता हारगे व अभिजीत हारगे यांच्या पाठपुराव्यामुळे महात्मा बसवेश्वर यांच्या चबूतऱ्यासह पुतळा बसविण्यास परवानगी मिळाली आहे. मिरज शहरातील लिंगायत समाजबांधवांकडून जिल्हाधिकारी मा.अशोक काकडे साहेब यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी स्थायी समिती सभापती संगीता हारगे, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, उद्योजक गजेंद्र कल्लोळी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विराज कोकणे, माजी नगरसेवक प्रसाद मदभावीकर, विजय माळी,भाजप चे जयगोंड कोरे.विक्रम पाटील, ईश्वर जनवाडे, आकाश कांबळे,अनिल हारगे, रमेश मेंढे,अनिल पाटील, सौरभ कुलकर्णी, सौरभ ताशीलदार,उमेश हारगे, महेश बसरगे, प्रदीप कोरे,बंडू लकडे, चिन्मय हारगे यांचासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List