तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी अध्यक्ष स्थानावर बसून केलेल्या राजकीय शेरेबाजीवर विरोधकांनी घेतला आक्षेप अध्यक्ष पदाची गरिमा ही राखली पाहिजे

राजकीय विधान करणाऱ्यांना या स्थानावर बसण्याचा अधिकार आहे का?

तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी अध्यक्ष स्थानावर बसून केलेल्या राजकीय शेरेबाजीवर विरोधकांनी घेतला आक्षेप अध्यक्ष पदाची गरिमा ही राखली पाहिजे

आधुनिक केसरी न्यूज

मुंबई, दि.४ - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत विरोधकांनी २९३ अन्वये प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावावर बोलण्यासाठी विरोधकांनी नाव दिले होती. पण काही आमदार उपस्थित नसल्याने तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी राजकीय शेरेबाजी केली. यावर विरोधकांनी विधानसभेत आक्षेप घेतला.

या प्रस्तावावर चर्चा होत असताना कृषिमंत्री, त्या विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते, तरी कामकाज सुरू  ठेवले होते. पण काही सदस्य उपस्थित नसल्याने तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी अध्यक्षांच्या स्थानावर बसून सरकारची भूमिका मांडली, असा त्यांना अधिकार आहे का? अध्यक्ष पदाची एक गरिमा आहे अस असताना तिथून राजकीय भाषण होणे योग्य नाही, तीस वर्ष या सभागृहात काम करताना असा प्रकार घडलेला नाही अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. 

तालिका सभाध्यक्ष बसले असले तरी त्यांना अध्यक्ष म्हणून मानून मान दिला जातो पण विरोधी पक्षातील काही सदस्य उपस्थित नाही म्हणून राजकीय टिपण्णी केली जाते. जेव्हा की सभागृहाचे कामकाज नीट व्हावे ही जबाबदारी सरकारची असते, ज्या विभागाचा प्रस्ताव असतो त्या विभागाचे मंत्री सभागृहात उपस्थित आहेत की नाही हे पाहणे संसदीय कामकाज मंत्र्यांचे असते. अश्यावेळी सभागृहात सर्वोच्च स्थानावरून सभागृहाची प्रथा परंपरा किंवा संकेत पाळले पाहिजे. राजकीय भाष्य करणाऱ्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार आहे का? याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

विधानसभा अध्यक्ष यांनी या प्रकारची गंभीर दखल घेतली. संविधानाने दिलेल्या आदेशाने जे नियम आहेत त्या चौकटीत राहून पीठासीन अधिकाऱ्यांनी काम करणे आवश्यक आहे. सभागृहात अध्यक्ष या आसनाचा वापर राजकीय हेतूने होणार नाही असे आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी यावेळी दिले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपूर आणि घुग्घूसमधील हजारो घरांचे मालकी हक्क रखडलेले, स्थायी पट्टे द्या : आ.किशोर जोरगेवार चंद्रपूर आणि घुग्घूसमधील हजारो घरांचे मालकी हक्क रखडलेले, स्थायी पट्टे द्या : आ.किशोर जोरगेवार
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : आणि  घुघ्घुस  येथील नागरिक मागील ५०–६० वर्षांपासून नझुल जागेवर वास्तव्यास असूनही, त्यांना अतिक्रमणधारक म्हणून नोटिसा...
श्रींची पालखी पंढरपुरात दाखल ! 33 दिवसात 9 जिल्ह्यातून 750 किमी पायी वारी..!
नमामि गोदावरी कृती आराखडा अंमलबजावणी; जिल्हाप्रशासनातर्फे गोदावरी स्वच्छतेसाठी सामंजस्य करार
तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी अध्यक्ष स्थानावर बसून केलेल्या राजकीय शेरेबाजीवर विरोधकांनी घेतला आक्षेप अध्यक्ष पदाची गरिमा ही राखली पाहिजे
शेतकऱ्यांच्या हितासाठी सोलर कृषीपंप धोरणात सुधारणा आवश्यक ; आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी
पुणे ग्रामीण पोलिसांकडून स्वामी चिंचोली अत्याचार प्रकरणातील आरोपीचे स्केच जारी
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल - रखुमाईला मुख्यमंत्र्यांच्या निवडीनुसार महावस्त्र रवाना