कारकीन गावात कृषी दुतांकडून कृषी दिन उत्साहात साजरा..!
आधुनिक केसरी न्यूज
लक्ष्मीकांत मुंडे
किनवट : कांचनवाडी येथील सी. ए. एम. एस. एस महाविद्यालयाच्या कृषी दुतांकडून कारकीन गावात 1 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नसरीन आंबेकर या होत्या , प्रमुख पाहुणे म्हणून कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कार्यक्रम अधिकारी कादरी सर हे होते, यावेळी कृषिदूत श्रीकांत मुंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमातर्गत वक्तृत्व स्पर्धा व वृक्षारोपण राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर त्यांना आयोजकांच्या वतीने प्रोत्साहनरुपी भेटवस्तू व खाऊ वाटप करण्यात आले. कृषी महाविद्यालय कांचनवाडी येथील सातव्या सत्रातील कृषीधूंनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित सरपंच ,उपसरपंच शालेय समितीचे अध्यक्ष, कृषी सहाय्यक ,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.हा कार्यक्रम कृषी महाविद्यालयाचे संचालक माननीय श्री प्राचार्य डॉक्टर जगदीश जहागीरदार, प्राचार्य प्रवीण बैनाडे, उपप्राचार्य अतुल भोंडवे, कार्यक्रमाचे समन्वयक रावे राजूसिंग डोंगरजाळ यांच्या मार्गदरनाखाली व कृषीदूत श्रीकांत मुंडे, ओमकार नागरगोजे, आदेश निकोसे, अभिषेक नी्ंगशेट्टी, मोहम्मद शोएब, शुभम देवकते, ऋषिकेश चु्ंगडे,पायल मोटिंगे व ऋतिका नाईक यांच्या अथक परिश्रमाने सम्पन्न झाला.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List