हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांची जयंती परतुर तालुक्यांतील शासकीय कार्यालयांना विसर
आधुनिक केसरी न्यूज
जगदीश राठोड
जालना : हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांची जयंती परतुर तालुक्यात शासकीय कार्यालयात साजरी न केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांना निवेदन देण्यात आले. वसंतराव नाईक साहेबांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविदयालय मध्ये साजरी न करता समाजाच्या भावना दुःखवीणा-यात आल्या आहेत. तरी जयंती साजरी न करणा-या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी सदर्भ-शासन परिपत्रक क्रमांक: GAD-49022/50/2024-GAD (DESK-29) महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भुषविणारे, आधुनिक महाराष्ट्रो शिल्पकार, हरित कांतीचे जनक, रोजगार हमीचे जनक, मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्या 112 वी जयंती सर्व राज्यभर कृषिदिन म्हणून मोठ्या उत्साहता साजरी करण्यात येते. परंतू जालना जिल्हामधील शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविदयालय, जयतीचा विसर पडलेला दिसून आले आहे. आज रोजी बंजारा समाज कोणत्याही वादामध्ये नाही जयंती साजरी न करून समस्त बंजारा समाजाच्या भावना दुःखविल्या आहेत. तरी बंजारा समाजाचा आदराचा भान ठेवून जयंती साजरी न करण्या-यांची सखोल चौकशी करण्यात यावी. ज्यांनी साजरी केली आहे त्या कार्यालय, शाळा, महाविदयालयातील Geo Tagging Photo किंवा फोटो, पंचनाम सादर करण्याचे सुचना आपणा मार्फत देऊन सखोल चौकशी करण्यात यावी नसता सर्व जालना जिल्हातील बंजारा समाज विभागीय आयुक्त कार्यालय समोर आमरण उपोषण करेल.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List