आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल - रखुमाईला मुख्यमंत्र्यांच्या निवडीनुसार महावस्त्र रवाना
आधुनिक केसरी न्यूज
नाशिक : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा करण्यात येते या पूजेसाठी मुख्यमंत्र्यांच्या वतीने विठ्ठल रखुमाईसाठी रेशमी पोशाख बनवण्यात आला आहे. महापूजेच्या वेळी देवतांना हा पोशाख घातला जाईल .भाजपा अध्यात्मिक आघाडी प्रमुख श्री तुषार भोसले हा पोशाख घेऊन उद्या नाशिकहून पंढरपूर कडे रवाना होतील. तेथे मंदिर समितीकडे हा पोशाख सुपूर्द करण्यात येईल. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या इच्छेनुसार जांभळ्या आणि केशरी रंगात हे पोशाख बनवण्याची जबाबदारी भाजपा अध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांच्यावर सोपवण्यात आली होती. या पोशाखांमध्ये श्री विठ्ठलासाठी जांभळा रंगाचा भरजरी रेशमी बाराबंदी अंगरखा, केशरी रंगाचे सोळे आणि भरजरी शेला तयार करण्यात आला आहे .तर रुक्मिणी मातेसाठी जांभळ्या रंगाची पारंपारिक मोराचे डिझाईन आणि काठ असलेली भरजरी रेशमी नऊवारी पैठणी आणि भरजरी केसरी शेला बनवण्यात आला आहे. सर्व पोशाखा भर जरी लेस लावून पोशाखाची शोभा आणखीन वाढवण्यात आली आहे .पुणे येथील कारागिराकडून आठ दिवसात हा पोशाख बनवून घेण्यात आला आहे .तर विठ्ठलाची बाराबंदी पंढरपूर येथील कारागिराकडून शिवून घेण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल विठ्ठलाच्या आषाढी एकादशीच्या सोहळा 3 दिवसांवर आला असून आषाढीनिमित्त लाखोंच्या संख्येने वारकरी विठुरायाच्या ओढीने पंढरपूरकडे दर्शनासाठी मार्गस्थ झाले आहेत. यावर्षी वारकऱ्यांना या भरजरी पोशाखामध्ये विठुरायाचे दर्शन होणार आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List