आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर कामगार मंत्री चंद्रपुरासाठी घेणार विशेष बैठक..!
पावसाळी अधिवेशनात आ. जोरगेवार यांची मागणी, कामगारांचे प्रश्न लागणार मार्गी.
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : अनेक औद्यागीक संस्थांनी सुरक्षारक्षकांची मागणी केली आहे. ते नौकरी देण्यास तयार आहे. मात्र सुरक्षा रक्षक मंडळ कामगारांची नोंदणी करुन घेत नसल्याने नोंदणीकृत कामगारांची संख्या कमी आहे. परिणामी मागणी असूनही कामगार पूरवता येत नसल्याचा आरोप करत सूरक्षारक्षक मंडळाने तात्काळ सुरक्षा रक्षकांची नोंदणी करावी याबाबत कामगार मंत्री यांनी चंद्रपूरसाठी बैठक लाववी अशी मागणी पावसाळी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. आहे. यावर अधिवेशन संपताच विशेष बैठक घेण्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी मान्य केले आहे.
पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या सत्रात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगारांचा प्रश्न उपस्थित करून येथील सुरक्षारक्षकांच्या समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावर उत्तर देताना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी अधिवेशन संपल्यानंतर या संदर्भात विशेष बैठक घेण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपूरमधील कामगारांचे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.चंद्रपूर जिल्ह्यात सध्या ५० हजारांहून अधिक कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करणारी सक्षम यंत्रणा अद्याप अस्तित्वात नाही. अनेक आस्थापनांनी आपल्या सुरक्षारक्षकांची नोंद केली असली, तरी प्रशासनाकडून त्यांच्या नोंदणीबाबत उदासीनता आहे. परिणामी, या कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे चंद्रपूर येथे विशेष बैठक घेऊन कामगारांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी पावसाळी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.आज विधीमंडळात या मुद्द्याकडे लक्ष वेधताना आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे विशेष मागणी करत सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील कंत्राटी कामगार, विशेषतः सुरक्षारक्षक यांच्या नोंदणी प्रक्रियेत अपुऱ्या यंत्रणेचा फटका कामगारांना बसतो. त्यामुळे या कामगारांचे हक्क आणि कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. कामगार मंत्री यांनी स्वतः चंद्रपूर जिल्ह्याला भेट द्यावी, स्थानिक अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी आणि या कामगारांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.या मागणीला उत्तर देताना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातील कामगार समस्यांवर विशेष बैठक घेण्यात येईल. तसेच सुरक्षारक्षक कामगारांची नोंदणी करण्याचे आदेश दिले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो कंत्राटी कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List