एसटी ऑटोच्या अपघातात 10 जण जखमी, करडखेड फाट्याजवळील घटना
आधुनिक केसरी न्यूज
देगलूर : एसटी व ऑटोची धडक होऊन ऑटोतील 10 मजूर प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरुवार दि 26 जून रोजी सकाळी दहाच्या सुमारास करडखेड फाट्याजवळ घडली. या घटनेतील दोन रुग्णास पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली आहे.
देगलूर आगारातून उदगीर आगाराची एसटी ( क्रमांक एम एच 14 बीटी 39 97 ) गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता उदगीर कडे जात होती तेव्हा करडखेड फाट्याजवळ मुखेड तालुक्यातील गोजेगाव येथून एका ऑटो मध्ये 10 मजूर प्रवासी देगलूर कडे काम करण्यास येत होते .या दरम्यान उपरोक्त दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन ऑटो मधील 10 जण जखमी झाले आहेत. तात्काळ जखमी मजूरांना येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरेश देवणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक उपचार करून सुभाष मोरे व बाबू पापडु यांना पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविले आहे, तर विठ्ठल चंदर
डोडलवार 31, मारुती मोहन फिरंगवाड 19, धनाजी तुळशीराम सकनुरे 30, संतोष गोविंदराव डापके 30, संदीप मोहन फिरंगवाड 19, नागनाथ राम सकनुरे 35, दामाजी माधव फिरंगवाड 28, व्यंकट माधव फिरंगवाड 40, यांच्यावर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहे. या अपघाताची कोणतीही तक्रार येथील पोलीस ठाण्यात अद्याप तरी आली नसल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे.
खा . डॉ. अजितजी गोपछडे यांची तत्परता : या घटनेची माहिती राज्यसभा खा. डॉ. अजितजी गोपछडे यांना समजताच तात्काळ त्यांनी दिल्लीहून येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून मजूर रुग्णाची अस्तेवाईकपणे चौकशी केली.व त्यानंतर योग्य तो उपचार करण्याच्या सूचना दिल्या.. यावरून खा. डॉ. गोपछडे यांना सर्वसामान्य माणसाप्रती किती आपुलकी आहे याची प्रचिती दिसून येते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List