उस्माननगर पोलीसांनी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा अडीच महिन्यानंतर शोध घेवुन आरोपीस केली अटक
आधुनिक केसरी न्यूज
शिवकांत डांगे
कंधार : पालकाच्या निगरानित असलेल्या अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस उस्माननगर पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे नाशिक जिल्ह्यातून तब्बल अडीच महिन्यानंतर आरोपीस घेतले ताब्यात. कंधार तालुक्यातील बामणी ( प.क. ) येथील रहिवाशी असलेला परमेश्वर वैजनाथ सांगळे वय (२६) व बालाजी वामनराव केंद्रे रा. नागदरवाडी ता. लोहा यांनी संगणमत करुन एका अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवून नेले होते. या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात पालकाच्या तक्रारीवरुन गु.र.नं. ५३ / २०२५ कलम १३७ (२),६४ (I ),(N),३ (५ ) भा.न्या.सं सह ४,८,१७,१८ पोस्को मधील गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेपत्ता मुलगी ही अल्पवयीन असल्याने आरोपीविरुध्द पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल असल्याने पोलिसांनी कसून तपासणी केली. परंतू हाती काही लागत नव्हते. त्यामुळे तांत्रिक मदतीचा आधार घेत आरोपीचा शोध मा.अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड,सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड , डॉ. अश्विनी जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग कंधार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे चक्रे उस्माननगर पोलीसांनी फिरवून तांत्रीक मदतीच्या सह्याने शोध घेतला असता उपरोक्त आरोपी नाशिक जिल्ह्यातील कासारवाडी ता.सिन्नर जि.नाशिक येथील ज्ञानेश्वर बाबूराव शेळके यांच्या शेतातील आखाड्यावर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलिस उपनिरिक्षक गजानन गाडेकर, सुनिल सूर्यवंशी, महिला पोलिस अंमलदार शिल्पा वाघमारे, पोहेकॉ पवार, रेजितवाड, पेदेवाड यांच्या पथकाने नाशिक जिल्ह्यात जावून परमेश्वर वैजनाथ सांगळे या आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आले.व दुसरा आरोपी बालाजी वामनराव केंद्रे रा.नागदरवाडी ता.लोहा यांचा शोध घेवुन आरोपींच्या पिडीत अल्पवयीन मुलीस उस्माननगर पोलीसांच्या आब्यात असून दुस-या आरोपीस अटक करण्याच्या मार्गावर आसल्याचे समजते.
ह्या उत्कृष्ट कामगीरीबद्दल संजय निलपत्रेवार सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन उस्माननगर, पोउपनि गजानन गाडेकर, सुनिल सुर्यवंशी ,महिला पोलीस अंमलदार शिल्पा वाघमारे ,पोहेकाॅ पवार,रेजितवाड, पोकाॅ पेदेवाड यांचे मा.पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List