Breaking News...आ.मंजुळा गावितांचे अनेक तासांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर ठिय्या आंदोलन,नवीन अजेंडा काढण्याची मागणी
साक्री नगरपंचायतीचा नगराध्यक्षांविरुद्धचा अविश्वास ठराव अधिकाऱ्यांच्या दांडीमुळे बारगळला,अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव,आमदार आंदोलनावर ठाम
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रशेखर अहिरराव
साक्री : साक्री नगरपंचायतीच्या भाजपा नगराध्यक्षांच्या मनमानी कारभारा विरोधात सत्ताधारी भाजपा सह विरोधकांनी जिल्हाधिकाऱ्यांना विश्वासाचा ठराव काही दिवसांपूर्वी दिला होता. आज अविश्वास ठरावा बाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी रोहन कुवर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता साक्री नगरपंचायतीमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र दिलेल्या वेळेपेक्षा अधिकचा काळ उलटूनही निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित राहू न शकल्याने भाजपा नगराध्यक्षां विरोधातील अविश्वास ठराव बारगळला. यामुळे संतप्त झालेल्या काही नगरसेवकांनी आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला. मात्र प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या ( शिंदे गट) आ आमदार मंजुळा गावित गेल्या तीन तासांहुन अधिकच्या काळापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर ठिय्या आंदोलनाला बसले आहे. मात्र जिल्हाधिकारीच उपस्थित नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र जोपर्यंत मनमानी करणाऱ्या नगराध्यक्ष विरोधात नव्याने अजेंडा जिल्हाधिकारी कार्यालयातून निघणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा आमदार मंजुळा गावित यांनी प्रशासनाला दिला आहे. अनेक तासांपासून ठिय्या आंदोलन करून ही कुठल्याच अधिकाऱ्याने दखल घेतली नसल्याचा देखील आरोप आमदार गावीत यांनी केला आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List