Breaking News... माजी राज्यमंत्री स्व.वामनराव गड्डमवार यांची कन्या,महिला नेत्या,बँकेची माजी संचालक सौ.नंदाताई अल्लुरवार यांचा भाजपात प्रवेश
On
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : चंद्रपुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ माजी राज्यमंत्री स्वर्गीय वामनराव गड्डमवार यांची कन्या सौ नंदाताई अल्लुरवार यांचा आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी भाजपामध्ये प्रवेश झाला. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक अत्यंत नाट्यमय वळणावर आलेली असताना नंदाताई अल्लूरवार या महिला प्रवर्गातून अविरोध म्हणून आजच निवडून आलेल्या आहेत आणि आजच त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशही घेतलेला आहे.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदाताई अल्लुरवार यांनी भारतीय जनता पार्टीत घेतलेला प्रवेश अनेक नवीन नाट्यमय घडामोडींना वळण देईल अशी शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
28 Jun 2025 09:05:59
आधुनिक केसरी न्यूज प्रणव वराडे लोणार : तालुक्यात काल दिनांक २६ जून रोजी सकाळी मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. त्यात बऱ्याच...
Comment List