आक्षेपार्ह फलक प्रकरण योग्य चौकशी करा : प्रशांत कदम
पंधरा दिवसात छडा न लावल्यास उबाठातर्फे तीव्र आंदोलन प्रशांत कदम यांचा इशारा
आधुनिक केसरी न्यूज
वरोडा : शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेत निर्माण झालेली अस्वस्थता व शहरात आज लागलेले आक्षेपार्ह फलक याची चौकशी करण्यासाठी उबाठा गटाचे विदर्भ संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांनी आज वरोड्याला भेट दिली. शहरात लागलेल्या आक्षेपार्ह फलकांबाबत त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जात तक्रार नोंदवली व योग्य कारवाई करण्याची मागणी केली. या आक्षेपार्ह फलक लावणाऱ्याचा शोध पंधरा दिवसात करून त्यांचेवर योग्य कारवाई करण्यात न आल्यास शिवसेना उबाठा गटातर्फे आनंदवन चौकात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिला.
भद्रावती शहरातील अशाच प्रकारचे आक्षेपार्ह फलक लावण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवसेना सैनिकांना सन्मानाने पद बहाल करत असून व्यक्ती पक्षाला नव्हे तर शिवसेना कार्यकर्त्याला मोठे करते. परंतु कार्यकर्त्यांना सन्मान मिळाल्यानंतर ते आपल्या स्वार्थासाठी पक्षांतर करतात रवींद्र शिंदे यांच्याबद्दल अनेक चौकश्या सुरू आहेत. त्यातून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी त्यांनी भाजप प्रवेश केला असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.येथील विश्रामगृहात प्रशांत कदम यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या बैठकीत नवीन जिल्हाप्रमुखांबाबत सैनिकांचे मत जाणून घेतले. या बैठकीचा अहवाल ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहेत. यानंतरच चंद्रपूर जिल्हा प्रमुखांची नेमणूक केली जाईल अशी माहिती आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गि-हे, युवा सेनेचे जिल्हा संघटक मनीष जेठाणी, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद पुरी, माजी नगरसेवक पंकज नाशिककर यांचेसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List