तहसीलदारांनी केला नदीच्या पाण्यातून ट्रॅक्टरचा पाठलाग  तहसीलदार मुंगाजी काकडे यांच्या धाडसाने वाळू तस्कर हादरले

पाच ट्रॅक्टर चालक मालकावर गुन्हा दाखल  विना नंबरच्या ट्रॅक्टर द्वारे वाळू तस्करी

तहसीलदारांनी केला नदीच्या पाण्यातून ट्रॅक्टरचा पाठलाग  तहसीलदार मुंगाजी काकडे यांच्या धाडसाने वाळू तस्कर हादरले

आधुनिक केसरी न्यूज

लक्ष्मीकांत मुंडे 

श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्राला लागून असलेले मौजे धानोरा या ठिकाणी नदीपात्रातून ट्रॅक्टर द्वारे वाळू चोरी होत असल्याची खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्याने तहसीलदार मुगाजी काकडे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंथूला यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाहीसाठी गेले असता वाळू तस्करांनी पाचही ट्रॅक्टर नदीपात्रातील पाच ते सहा फूट पाण्यातून विदर्भात पळवून नेले  नदी पात्रा पर्यंत तहसीलदारांनी शासकीय वाहन सोडून मोटरसायकल द्वारे जीव धोक्यात घालून ट्रॅक्टर पकडण्याचा धाडसी प्रयत्न केल्याने त्यांच्या या  धाडसाने वाळू तस्करांचे धाबे दणाणले तर नागरिकांतून त्यांच्या या कारवाईसाठी घेतलेल्या अफाट भूमिकेमुळे तहसीलदार मुगाजी काकडे चर्चेचा विषय ठरले असून पाचही ट्रॅक्टर चालक मालकाविरुद्ध  माहूरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना दि 15 रोजी दुपारी 2.00 वाजता घडली आहे

आज दिनांक 15/07/2025 रोजी दुपारी 02.00 वाजताचे सुमारास तहसिलदार मुगाची काकडे यांना तलाठी सज्जा दिगडी अंतर्गत धानोरा गावाजवळ पैनगंगा नदिपात्रातील वाळू उपसा करुन क्ट्रक्टरमध्ये भरुन चोरी करत आहेत अशी माहिती मिळाल्यावरुन तहसिलदार  मुगाजी काकडे  यांचेसोबत शंकर मल्लारी चंदणकर मंडळ अधिकारी वानोळा शासकीय वाहन क्र एमएच 26 2052 मध्ये बसुन धानोरा गावात गेले. गाडी विलास लक्ष्मण शेडमाके हे गाडी चालवित होते. धानोरा येथे गेल्यानंतर पोलीस पाटील बालाजी गोविंद कवाने यांना बोलाऊन घेतले. त्यानंतर आम्ही सर्वजन नदिपात्राकडे जात असताना  नदिपात्राचे काठाजवळ गेले असता पैनगंगा नदिपात्रातुन वाळुने भरलेले पाच ट्रक्टर रोडवर येत होते.जीप ट्रक्टरकडे येत आसल्याचे पाहुन नट्रक्टर चालकांनी जुण्या गावठाणाजवळ आपल्या ट्रक्टरमधील  एक ब्रास या प्रमाणे अंदाजे पाच ब्रास वाळु रोडच्या बाजुला खाली टाकुन पळून जात होते. तहसिलदार मुगाची काकडे यांनी ट्रक्टर चालकांना ट्रक्टर थांवविण्यास सांगीतले असता त्यांनी ट्रक्टर थांबविले नाही. उलट पैनगंगा नदी पात्रातील पाण्यातून त्यांनी ट्रॅक्टर टाकून विदर्भात पळून नेले त्याचा मोटरसायकल द्वारे पाठलाग  नदीपात्रापर्यंत तहसीलदार मुगाची काकडे यांनी केला परंतु ते सापडले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दोन ट्रॅक्टरचे नंबर लिहून घेतले  दोन ट्रक्टरचे क्रमांक एमएच 29 टीई 0212, एमएच 38 बी 1080 असे असून तीन ट्रक्टरवर पार्सीग क्रमांक नव्हते.

तरी दिनांक 15.07.2025 रोजी दुपारी 03.00 वाजताचे सुमारास ट्रक्टर क्रमांक एमएच 29 टीई 0212, एमएच 38 बी 1080 व पासींग क्रमांकर नसलेले तीन ट्रक्टर असे एकुन पाच ट्रक्टरचे चालक मालकांनी विनापरवान अवैद्यदित्या पैनगंगा नदीपात्रातील पाच ब्रास वाळु किमंती 30,000 रुपये चा उपसा करुन चोरी केली आहे. तरी त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई अशी तक्रार मंडळ अधिकारी पेंटेवाड यांनी दिल्याने माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी तात्काळ ट्रॅक्टर चालकामा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला पळवून नेलेले ट्रॅक्टर तात्काळ जमा करण्यात येतील अशी माहिती पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिली

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारीजे जेनीत चंद्रा दोंथूला यांच्या मार्गदर्शनाखाली वाळू तस्कराविरुद्ध मोहीम सुरू असून वाळू तस्करांनी शहाणपणा करत वाळू चोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई या दोन्ही कारवाईला सामोरे जावे लागेल आणि वेळप्रसंगी जायमोक्यावर परिस्थितीनुसार महाप्रसादासारखी खाजगी कारवाई करण्यात येईल 

 मुंगाजी काकडे - तहसीलदार माहूर

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

रत्नपाल जाधव यांच्या कडून पत्रकारांच्या एस.टी.प्रवास सवलतीत सुधारणा होणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक  रत्नपाल जाधव यांच्या कडून पत्रकारांच्या एस.टी.प्रवास सवलतीत सुधारणा होणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : दि.१७ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या...
मिरजेमध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारणीस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता;  लिंगायत समाज बांधवांकडून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा सत्कार
गोदावरी खोऱ्यातील प्रकल्प बंदी उठवावी : आमदार काशिनाथ दाते
सुपा टोलनाका म्हणजे जनतेसह  शासनाचीही लूट !
पाच हजार रुपयांची लाच घेताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकाला रंगेहात अटक.
आक्षेपार्ह फलक प्रकरण योग्य चौकशी करा : प्रशांत कदम
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाच्या 'विक्री'! शहरात लागलेल्या फलकांमुळे खळबळ