श्रींची पालखी पंढरपुरात दाखल ! 33 दिवसात 9 जिल्ह्यातून 750 किमी पायी वारी..!

श्रींची पालखी पंढरपुरात दाखल ! 33 दिवसात 9 जिल्ह्यातून 750 किमी पायी वारी..!

आधुनिक केसरी न्यूज

 दिपक सुरोसे

शेगाव : टाळ-मृदुंगाची ध्वनी। दिंड्या पताका घेऊनी ।।१।।
संत जाती पंढरीसी । देव सामोरा ये त्यासी ॥२॥
देऊनिया आलिंगन । त्याचा घेतो भागशीण ॥३॥
सर्व तीर्थांचे माहेर जनी म्हणे पंढरपूर ||४||

माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी।। 
या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगातील भावनेप्रमाणे महाराष्ट्रातील विविध भागांतून निघालेल्या संतांच्या पालख्या आज (दि.4 जुलै) अखेर भूवैकुंठ पंढरपुरात पोहोचल्या आहेत. पावलो पंढरी वैकुंठ भुवन। धन्य आजी दिन सोनियाचा॥ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आलेले वारकरी भरून पावल्याची भावना व्यक्त करत आहेत राज्यासह देश विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव येथील संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे आज मंगळवेढा येथील दुपारच्या विसाव्यानंतर सायंकाळी ठीक चार वाजता पंढरपूर येथे आगमन होणार आहे आषाढी एकादशी उत्सवात त सहभागी होण्यासाठी तब्बल 33 दिवसापासून नऊ जिल्ह्यातून सातशे पन्नास किलोमीटर पायी प्रवास करत वारकरी भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी तसेच आषाढी एकादशी उत्सवासाठी पंढरीत दाखल होणार आहेत.
 श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथून दरवर्षी टाळ मृदंगाच्या गजरात श्रींची पालखी पंढरपूर येथे आषाढी एकादशी उत्सवासाठी जात असते पालखीचे यंदा 56 वे वर्ष आहे. यावर्षी पालखीमध्ये सातशे वारकरी सहभागी झाले आहेत. ज्ञानोबा माऊली तुकाराम, राम कृष्ण हरी, गण गण गणात बोते असा नाम घोष आणि टाळ मुद्रांगाच्या गजरात मजल दरमजल करत ही पालखी संतनगरी कडून पंढरीकडे निघालेली आहे अखेर आज पालखी आपल्या महत्त्वाच्या टप्प्यावर अर्थात पंढरपूरला सायंकाळी पोहोचेल तत्पूर्वी प्रसिद्ध अशा मंगलवेढा येथे पालखीचा मुक्काम होता. श्री संत गजानन महाराज संस्थान सेवा शिस्त आणि स्वच्छता यात्री सूत्रीसाठी जगात प्रसिद्ध असून पालखीत सुद्धा ही शिस्तबद्धता पाहायला मिळते.
शिस्तबद्ध पालखी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेगाव येथील श्री गजानन महाराजाचा पालखी सोहळा गण गण गणात बोते ‘व टाळ मृदंगाच्या गजरात प्रमुख मार्गावरून मंगळवेढ्यात विसावला. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली शेगाव येथील मंदिरातून 2 जूनला निघालेल्या या दिंडीचा प्रवास 33 दिवसात 9 जिल्ह्यातून 750 किमी चालत प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये पोहचणार आहे.
श्रीं’च्या पंढरपूर पालखी पायी वारीचे यंदा 56 वे वर्ष आहे. शहरात श्रींची पालखी सोहळा दाखल होतांच ठिक ठिकाणी रांगोळी काढून श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा सोबत भगव्या पताका खांद्यावर घेतलेले श्वेतवस्त्रधारी 700 वारकरी , 9 वाहन, 2 घोडे , बँड पथक, सनई चौघडा वाद्यसह शिस्तबद्ध रांगा अशी तीर्थक्षेत्र शेगाव ते पंढरपूर दरम्यान पायी चालत प्रवास करीत पालखीचे ठीक ठिकाणी  जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.


 श्री क्षैत्र पंढरीत श्रींच्या पालखीचा मुक्काम 4 जुलै ते 9 जुलै पर्यंत श्री गजानन महाराज संस्थानच्या पंढरपूर शाखेत श्रींच्या पालखीचा 5 दिवस मुक्काम राहणार आहे. या ठिकाणी विविध धार्मिका कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे यात भजन, प्रवचन, हरिपाठ, किर्तन. इत्यादी. आलेल्या भाविकांना दि.3 जुलै ते 7 जुलै असे पाच पंढरपूर शाखेत महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. श्रींच्या पालखीचा परतीचा प्रवास संत नगरी शेगाव कडे दि.१० जुलै रोजी सुरू होईल. पंढरपूर ते शेगाव हा ५५० किमी चा प्रवास आहे. असा येण्या जाण्याचा १३०० किमीचा पायी प्रवास श्रींच्या पालखीतील वारकरी भक्ती भावाने आनंदात करणार आहेत. ३० जुलै रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर ३१ जुलै रोजी गुरुवार रोजी श्रींची पालखी संतनगरी शेगावी पोहोचणार आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

काँग्रेस कमिटीच्या सेनगाव तालुकाध्यक्ष पदाची धुरा डॉ निळकंठ गडदे यांच्या खांद्यावर काँग्रेस कमिटीच्या सेनगाव तालुकाध्यक्ष पदाची धुरा डॉ निळकंठ गडदे यांच्या खांद्यावर
आधुनिक केसरी न्यूज हिंगोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यातील तालुक्याच्या कार्यकारणी जाहीर करण्यात...
पुणे जिल्ह्यात राजकीय भुंकप काँग्रेसला धक्का, आमदार संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा तसेच काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; कोणत्या पक्षात प्रवेश करणार?
पत्रकार अविनाश तराळ यांचा प्रामाणिकपणा : सापडलेले २० हजार रुपये केले परत
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भांगडीयांचाच भांगडा तर जोरगेवारांचाच जोर 
१३ वर्षांनंतर पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व.
वकील संघाच्या अध्यक्ष पदी अशोक मुळे यांचा विजय
उजनी धरण ९४ टक्के भरलं, धरणातून भिमा नदीत १६ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग