शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाच्या 'विक्री'! शहरात लागलेल्या फलकांमुळे खळबळ

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाच्या 'विक्री'! शहरात लागलेल्या फलकांमुळे खळबळ

आधुनिक केसरी न्यूज

वरोडा : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे हे जिल्हाप्रमुख पद  रिक्त झाले आहे.रिक्त झालेले हे जिल्हाध्यक्ष पद विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे शहरात लावलेल्या व्यंगात्मक फलक चर्च चर्चेचा विषय बनले असून यामुळे शहरात खळबळ माजली आहे.रवींद्र शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होण्यापूर्वी शिवसेनेचे युवा व धडकेबाज कार्यकर्ते मुकेश जीवतोडे  त्यांच्याकडे जिल्हा प्रमुख पद होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असतानाही त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली होती व दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. निवडणुकीनंतर मात्र त्यांनी उबाठा गटाशी फारकत घेत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर उभाठाच्या जिल्हाप्रमुखापदाची जबाबदारी रवींद्र शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या रणांगणात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे हे पद रिक्त झाले. रिक्त असलेल्या या पदासाठी शिवसेनेच्या एका गटाकडून शहरात *"चंद्रपूर उबाठा जिल्हाप्रमुख पद विकणे आहे"* असा आशय असलेली फलके शहरातील महत्त्वाच्या चौकचौकात लावली आहेत .यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.  

 *फलकांमधील धाडसी प्रस्ताव*
आनंदवन चौक, रत्नमाला चौक आणि इतर व्यापारी संकुलांवर लावलेल्या या फलकांमध्ये *"जिल्हाप्रमुख पद १० ते १५ लाख रुपयांमध्ये विकणे"** असे नमूद केले आहे. संपर्कासाठी *राऊत यांचे नाव* दिले असून, त्यांचे व्यंगचित्र काढून संपर्क साधण्याचा सल्लाही दिला आहे. फलकावर *"मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू"** अशी टीकात्मक ओळ लिहून पक्षाच्या आंतरिक कलहाचा उपहास केला आहे.  


ही घटना शिवसेनेमधील *गटबाजी आणि पदांसाठी होत असलेल्या धंदेवाईक राजकारणाचा* भाग आहे की एखाद्याचा खोडसाळपणा आहे हे सांगणे मात्र कठीण आहे. पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचाही हा प्रकार तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.

मात्र अलीकडच्या काळात पक्षातील उबाठा गटाचे नेते आणि कार्यकर्ते वारंवार पक्षबदल करत असल्याचे समाजमाध्यमांतून नेहमीच बोलले जाते . नेत्यांच्या या पक्ष बदलामुळे मात्र उबाठा गटाची या क्षेत्रातील ताकद क्षीण झालेली आहे. मात्र या फलकांमुळे पदाधिकाऱ्यांवरील विश्वास आणि राजकीय नैतिकतेचा ऱ्हास पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.  नागरिकांच्या मते अशा प्रकारचे  उघड टीकात्मक आवाहन पक्षाच्या एकात्मतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. काहींचा असा अंदाज आहे की ही घटना पक्षाच्या आंतरिक विरोधकांनी केलेली असावी, तर काही याला राजकीय पदांच्या बदल्यात अर्थलोभाचा प्रकार* मानतात. मात्र या घटनेमुळे पक्षाच्या प्रतिमेस धक्का बसल्याचे बोलल्या जात आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

रत्नपाल जाधव यांच्या कडून पत्रकारांच्या एस.टी.प्रवास सवलतीत सुधारणा होणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक  रत्नपाल जाधव यांच्या कडून पत्रकारांच्या एस.टी.प्रवास सवलतीत सुधारणा होणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : दि.१७ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या...
मिरजेमध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारणीस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता;  लिंगायत समाज बांधवांकडून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा सत्कार
गोदावरी खोऱ्यातील प्रकल्प बंदी उठवावी : आमदार काशिनाथ दाते
सुपा टोलनाका म्हणजे जनतेसह  शासनाचीही लूट !
पाच हजार रुपयांची लाच घेताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकाला रंगेहात अटक.
आक्षेपार्ह फलक प्रकरण योग्य चौकशी करा : प्रशांत कदम
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाच्या 'विक्री'! शहरात लागलेल्या फलकांमुळे खळबळ