कोबऱ्याची मस्ती जीवावर बेतली; गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील एका तरुणाचा कोबऱ्याच्या दंशामुळे मृत्यू..!
On
आधुनिक केसरी न्यूज
गोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. पाटील टोला येथील लक्की बागडे या युवकाचा साप चावल्याने मृत्यू झाला. पाटील टोला येथे कोबरा साप आढळल्याची माहिती लक्की बागडेला मिळाली. लक्की याला साप पकडण्याचा कोणताच प्रशिक्षण होता ना कोणती सुरक्षाव्यवस्था... केवळ मस्तीखोरीच्या नादात लक्की ने साप पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोबऱ्याने त्याच्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला. दंश झाल्यानंतर तातडीने त्याला तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचार सुरू असतानाच त्याची प्रकृती अधिक बिघडली. त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
11 Jul 2025 20:48:25
आधुनिक केसरी न्यूज निलेश मोरे पुणे : सोलापूर, नगर, जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण सध्या ९४ टक्के भरले असून धरणात एकूण...
Comment List