गोंदियात वेश्याव्यवसाय चालविणा-या दोघांना अटक..!
आधुनिक केसरी न्यूज
गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की, गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक येथील बस स्टापच्या समोरील बाजुस मॉस मेकअप स्टुडिओ एन्ड द बोंडीस स्पा सेंटर येथे मसाज च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु आहे. या खबरेची पुर्ण शहानिशा करून खात्री करण्यात आली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, यांचे सूचनेप्रमाणे आणी पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया शहर जयस्तंभ चौक , गोंदिया येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमंलदार तसेच बेटा बचाव राष्ट्रीय अभियान व नशा हटाव, बेटा बचाव या संस्थेचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष यांचे सह माँस मेकअप स्टुडिओ द एन्ड बांडीज स्पा सेंटर च्या आजुबाजूस सापळा रचून सदर ठिकाणी धाड टाकण्यात आले असता त्या ठिकाणी रुम मध्ये बेडवर ग्राहक सोबत एक महिला मिळून आली. त्या महिलेस विचारपुस करण्यात आली असता, मांस मेकअप स्टुडिओ द एन्ड बॉडीज स्पा सेंटर मालक बळीराम बस्ताराम घोटेकर आणि त्याचा भाऊ दिलीप बस्ताराम घोटेकर हे स्पा सेंटर मध्ये वेश्याव्यवसाय करायला लावतो असे सांगितल्याने सदर सेंटर ची पाहणी करण्यात आली असता पहिल्या मजल्यावर ४ महिला मिळून आल्या त्यांनी सुद्धा बलीराम बस्ताराम घोटेकर आणि त्याचा भाऊ दिलीप बस्ताराम घोटेकर स्पा सेंटर मध्ये वेश्याव्यवसाय करायला लावतो असे सांगितले.
मांस मेकअप स्टुडिओ एन्ड द बॉडीज स्पा सेंटर चे मालक बळिराम बस्ताराम घोटेकर, वय ३५ वर्षे, व दिलीप बस्ताराम घोटेकर, वय ३२ वर्षे, रा. रेलटोली, कस्तुर हॉटेल च्या बाजुला, गोंदिया, ता. जि. गोंदिया हे दिनांक १०/७/२०२५ रोजी सदर सेंटर मध्ये मिळून आलेल्या महिलांना पेशाचे आमिष देवून स्वत च्या आर्थिक फायद्याकरीता वेश्याव्यसाय करीत असतांना मिळून आल्याने त्यांचेविरुध्द पो. स्टे . गोंदिया शहर येथे अपराध क्रमांक ५४६/२०२५ कलम ३, ४,५.६ अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले असून सदर गुन्ह्याचे पुढील तपास सपोनि गेडाम पो. स्टे . गोंदिया शहर हे करीत आहे. पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कामगीरी सपोनी धिरज राजुरकर, पोउपनि वनिता सायकर, पोहवा राजेंद्र मिश्रा , पोहवा संजय चव्हाण , पोहवा महेश मेहर, पोहवा रियाज शेख, पोहवा प्रकाश गायधने, पोहवा सोमेन्द्रसिंग तुरकर , पो.शि. संतोष केदार, पो.शि. राकेश इंदुरकर, पो.शि. छगन विठ्ठले, मपोशि स्मिता तोंडरे, चापोशि राम खंडारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यांनी केली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List