उजनी धरण ९४ टक्के भरलं, धरणातून भिमा नदीत १६ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग

उजनी धरण ९४ टक्के भरलं, धरणातून भिमा नदीत १६ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग

उजनी धरण ९४ टक्के भरलं, धरणातून भिमा नदीत १६ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग

आधुनिक केसरी न्यूज

निलेश मोरे

पुणे : सोलापूर, नगर, जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण सध्या ९४ टक्के भरले असून धरणात एकूण ११४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे वर्षभराची जिल्ह्याची चिंता आताच दूर झाली आहे. सध्या दौंडवरून उजनीत २० हजार क्युसेकची आवक असल्याने धरणातून भीमा नदीत १६ हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला असून विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी १६०० क्युसेक पाणी सोडले आहे.

२७ मेपर्यंत उणे पातळीत असलेले उजनी धरण सव्वा महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणात दौंड व स्थानिक पावसाची आवक जास्त असल्याने आतापर्यंत धरणातून सुमारे २० टीएमसी (४० टक्के) पाणी भीमा नदीतून सोडून देण्यात आले आहे.
सध्या उजनीतून कॅनॉलद्वारे १९०० क्युसेक, बोगद्यातून ४०० क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून ८०० क्युसेक आणि दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ८० क्युसेकचा विसर्ग सोडला आहे. दौंडवरून मोठी आवक जमा होत असल्याने गुरुवारी (ता. १०) उजनीतून भीमा नदीत सोडलेला विसर्ग पाच हजार क्युसेकने वाढविला आहे.

पावसाळा आणखी दोन-अडीच महिने असल्याने उजनीचा पाणीसाठा ९२ ते ९४ टक्क्यांपर्यंत ठेवला जात आहे, जेणेकरून आगामी काळात दौंडसह स्थानिक विसर्ग वाढल्यास खूप मोठा विसर्ग नदीतून सोडावा लागणार नाही. मागील २० दिवसांपासून कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे,

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

१३ वर्षांनंतर पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व. १३ वर्षांनंतर पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व.
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : तब्बल १३ वर्षांनंतर पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे...
वकील संघाच्या अध्यक्ष पदी अशोक मुळे यांचा विजय
उजनी धरण ९४ टक्के भरलं, धरणातून भिमा नदीत १६ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग
टिसी मागितल्यावरून संस्थाचालकाने केली मारहाण पालकाचा मृत्यू; दोघांवर गुन्हा दाखल
शनि शिंगणापूर देवस्थानमधील आर्थिक अनियमिततेबाबत दोषींवर फौजदारी गुन्ह्यांचे आदेश : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भोकर तालुका काँग्रेसचे  अध्यक्ष भाजपाच्या गळाला..!
कोबऱ्याची मस्ती जीवावर बेतली; गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील एका तरुणाचा कोबऱ्याच्या दंशामुळे मृत्यू..!