टिसी मागितल्यावरून संस्थाचालकाने केली मारहाण पालकाचा मृत्यू; दोघांवर गुन्हा दाखल
आधुनिक केसरी न्यूज
विलास बारहाते
मानवत : परभणी तालुक्यातील झिरो फाटा येथील एका खाजगी निवासी शाळेत नुकताच दाखल केलेल्या विद्यार्थ्याची टिसी मागितल्याच्या कारणावरून संस्था चालकाने बेदम मारहाण केल्याने पालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.10) सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी संस्था चालकासह एकावर पुर्णा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, झिरो फाटा परिसरात बाळकृष्ण शिक्षण संस्थेची हायटेक निवासी शाळा आहे. या शाळेत मागील काही दिवसांपूर्वी उखळद ता. पुर्णा येथील जगन्नाथ पांडुरंग हेंडगे यांनी आपली मुलगी पल्लवी हिला हायटेक निवासी शाळेत दाखल केले होते. मात्र एका आठवडयातच मुलीचे मन लागत नसल्याने पालक जगन्नाथ हेंडगे आणि नातेवाईक गुरूवारी सायंकाळी हायटेक निवासी शाळेत टिसी काढण्यासाठी आले. संस्थाचालकांना टिसी देण्याची विनंती केली असता संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीने लाथा बुक्यांनी जबर मारहाण केली. येथून पालक कसेबसे बाहेर पडले असता नातेवाईक व उपस्थितांनी त्यांना परभणी येथे शासकीय रूग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. या प्रकरणी मुंजाजी हेंडगे यांच्या फिर्यादीवरून संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नी यांच्या विरूध्द पोलिसात बीएनएस कायद्याच्या विविध कमलान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान उपविभागीय अधिकारी समाधान पाटील, पोलिस निरिक्षक विलास गोबाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. शुक्रवारी सकाळपासूनच शाळा व परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मयत जगन्नाथ हेंडगे यांच्या पश्चात एक पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे उखळद व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List