वकील संघाच्या अध्यक्ष पदी अशोक मुळे यांचा विजय
आधुनिक केसरी न्यूज
अक्षय ताठे
छत्रपती संभाजीनगर : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या जिल्हा वकील संघाचा निकाल नुकताच हाती आला आहे. अध्यक्ष पदासाठी ४ उमेदवार रिंगणात होते. त्यात अँड भीमराव वंजारे आणि अँड अशोक मुळे ह्यांच्या मध्येच निकाल लागणार अशी सकाळपासून चर्चा होती. आता अध्यक्ष पदी अँड अशोक मुळे यांचा विजय झाला आहे. मुळे ह्यांना ६२५ मते तर वंजारे यांना ५५८ मते मिळाली. त्याच बरोबर उपाध्यक्ष पदी पुरुषांमध्ये अँड समीर जोशी यांनी तर महिलांमध्ये अँड सारिका पुरी यांनी बाजी मारली. सचिव पदी अँड योगेश तुपे यांचा सर्वात मोठ्या फरकाने विजय झाल्याचं दिसत. अँड अमोल घोडेराव यांची सह सचिव पदी निवड झाली. सर्वात जास्त उमेदवार हे सदस्य बनण्यासाठी इच्छुक बघायला मिळाले ह्यातच जास्त स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली. सदस्यपदी अँड शैलेशकुमार पंडितराव, अँड गणेश आधाने , अँड सचिन आगरकर, अँड रामेश्वर बोडखे , अँड दिपाली दळवे, अँड सांगपाल इंगळे, अँड जितेंद्र जैन ,अँड दिशा खंडाळे , अँड रागिणी लगड ,अँड राजेश नरवडे, अँड मीरा परदेशी यांची निवड झाली.
आता वकिलांसाठी उत्कृष्ट कार्य करण्याचा संकल्प नवीन कार्यकरणींने केला आहे .
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List