मराठा आरक्षणासावर मंत्री चंद्रकांत पाटील यांची खडसावून टीका अन् म्हणाले..!
आधुनिक केसरी न्यूज
ममुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मराठा बांधवांसह मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. 'ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत अशा मागण्यांसाठी ते बसले आहेत. हट्ट कशाला करता, सामान्य मुंबईकर जनतेला वेठीस धरु नका', असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. सांगलीच्या पोलीस मुख्यालयात एका कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटील बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, 'सरसकट मराठ्यांना कुणबी करा हे कोणत्याही कायद्यात नाही. सुप्रीम कोर्टाने देखील तसे म्हटले आहे. अशी मागणी कोणत्याही कायद्यात बसत नाही. प्रॅक्टिकल नियमांनी या. लोकशाहीत काहीही म्हणायला आणि आणायला परवानगी आहे. पण मुंबईसारखे शहर विस्कळीत करता येणार नाही. मुंबईतल्या सर्व सामन्यांचा काय दोष? मुंबईत ट्रॅफिक जाम झाले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, 'सरसकट मराठ्यांना कुणबी करा हे कोणत्याही कायद्यात नाही. सुप्रीम कोर्टाने देखील तसे म्हटले आहे. अशी मागणी कोणत्याही कायद्यात बसत नाही. प्रॅक्टिकल नियमांनी या. लोकशाहीत काहीही म्हणायला आणि आणायला परवानगी आहे. पण मुंबईसारखे शहर विस्कळीत करता येणार नाही. मुंबईतल्या सर्व सामन्यांचा काय दोष? मुंबईत ट्रॅफिक जाम झाले आहे.'
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List