पैठण तालुक्यातील गावागावातुन मुंबई ला आंदोलकांनासाठी चटणी - भाकरी- लोणचं
आधुनिक केसरी न्यूज
दादासाहेब घोडके
पैठण : घरापासून चारशे किलोमीटर दुर मुंबई ला गेलेल्या बाधंवासाठी पैठण तालुक्यातील गावागावातुन भाकरी, चटणी, लोणचं पोहच होत आहे.मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज पा.जरांगे यांनी केलेल्या आवाहनानंतर पैठणसह संपूर्ण महाराष्ट्र भरातुन मुंबईत उपोषणाला बसलेल्या, तेथे वेगवेगळ्या ठिकाणी आहे त्या परिस्थितीत ऊन वारा पाऊसाची तमा न बाळगता जीवाला जीव देत थांबलेल्या लाखो आरक्षण आंदोलकांना चटणी - भाकरी- लोणचं यांसह छत्र्या, रेणकोट, सतरंजी, नाष्टा,जेवणाचे महिनाभर पुरेल इतकं प्रचंड साहित्य वस्तूंचा मुंबईकडे ओघ सुरू झाला आहे. सर्वधर्मीय समाज बांधवांनी मनोज पा. यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आप आपल्या परिने यात योगदान दिले व देत आहे. विशेष म्हणजे जोपर्यंत ही न्याय लढाई सुरू असेल तोपर्यंत २४ तास अखंडपणे हा मदत- सहकार्य- पाठबळाचा महायज्ञ चालणार आहे. शनिवारी संध्याकाळी पैठण येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र करून मुबंई ला पोहच होत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List