वृद्ध महिलांना पीकअपची जोरदार धडक ; एक महिला जखमी तर एक ठार

वृद्ध महिलांना पीकअपची जोरदार धडक ; एक महिला जखमी तर एक ठार

आधुनिक केसरी न्यूज

सचिन सरतापे 
म्हसवड (सातारा ) : 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी सुमारे 06.15 वाजता पळशी, ता. माण, जि. सातारा येथील पिराची टेकडी देवीच्या मंदिराजवळील रस्त्यावर एक दुर्दैवी अपघात घडला. गावातीलच बाळाबाई दत्तात्रय गंबरे (वय 68) व लताबाई हनुमंत खाडे (वय 60) या दोन महिला मॉर्निंग वोकला जातं असताना, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या विना नंबर प्लेटच्या INTRA पिकअप  ने त्यांना जोरदार धडक दिली यां मध्ये एक महिला जखमी झाली असून एका महिलेचा मृत्यू झाला यां घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.अज्ञात चालकाने वाहन हयगईने, अविचाराने व निष्काळजीपणे चालवून, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत अपघात केला. धडकेनंतर वाहनचालक कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातात बाळाबाई गंबरे यांचा जागीच मृत्यू झाला असून लताबाई खाडे या गंभीर जखमी झाल्या आहेत.

या घटनेबाबत प्रकाश नाना खाडे (वय 48, रा. पळशी, ता. माण) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून गुन्हा रजिस्टर नंबर 274/2025 अन्वये BNS 106(1), 106(2), 281, 125(A), 125 (B), तसेच MV Act 184, 134(A) (B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा तपास सपोनि. अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक वाघमोडे हे करीत आहेत. सदर घटनेतील आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक तपास म्हसवड पोलीस करत आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वृद्ध महिलांना पीकअपची जोरदार धडक ; एक महिला जखमी तर एक ठार वृद्ध महिलांना पीकअपची जोरदार धडक ; एक महिला जखमी तर एक ठार
आधुनिक केसरी न्यूज सचिन सरतापे म्हसवड (सातारा ) : 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी सुमारे 06.15 वाजता पळशी, ता. माण,...
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मातृशोक..!
नेवासा फाट्यावर फर्निचर दुकानात भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळुन मृत्यू
पिकविम्याची वाढीव रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करून ओला दुष्काळ जाहीर करा'
पिरळसह पडळी पूल पाण्याखाली,वाहतूक बंद नदीकाठच्या भात, ऊस,केळी पिकात पाणी
राधानगरी धरणाचे सातही दरवाजे खुले : भोगावती नदीला पूर
भिगवण शहरामध्ये दहीहंडीचा उत्सव शिगेला..!