सततच्या पावसामुळे  मुंबई नागपूर महामार्गावरील कांचनगंगा नदीला पूर आल्याने 3 तास वाहतुक झाली ठप्प..!

सततच्या पावसामुळे  मुंबई नागपूर महामार्गावरील कांचनगंगा नदीला पूर आल्याने 3 तास वाहतुक झाली ठप्प..!

आधुनिक केसरी न्यूज

ज़ैनुल आबेद्दीन

डोणगाव : पावसाळा सुरू झाल्यापासूनच या वर्षी मोठ्या प्रमाणात वरून राज्याचे आगमन झाल्याचे पाहायला मिळत आहे डोणगाव व परिसरात कांचनगगा नदीला आलेला हा दुसरा पूर असल्याने नदीकाठावरील शेती पुन्हा एकदा खरडून गेली तर परिसरातील जवळपास सर्वच शेती क्षेत्र जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. शनिवार व रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभे पीक पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.

कांचनगंगा नदीला मोठा पूर आल्यामुळे डोणगाव–मेहकर रस्त्यावर पाणी आल्याने स्थानीक डोणगाव पोलिसांनी नदीच्या दोनही बाजूंनी बॅरिगेट लाऊन वाहतूक बंद केली होती . सकाळी आठ वाजता बंद केलेली वाहतूक पुलावरील पाणी कमी झाल्यानंतर अकरा वाजेच्या दरम्यान  सुरु करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत मागील वीस वर्षानंतर अशा पद्धतीच्या पावसाची हजेरी लागली आहे. त्यामुळे शेतातील पिके अक्षरशः शेवटच्या घटका मोजत असल्याने प्रशासनाने यावर्षी राज्यभरात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला भरीव मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

अतिवृष्टीमुळे शेलगावपार परिसरात  बाभळीचे झाड मुळापासून उखडून उच्च दाबाच्या लाईन वर पडले त्यामुळे लाईनचे दोन पोल नदीपात्रामध्ये वाहुन गेले. तीन रोहित्रातून पुरवठा होणाऱ्या विजेचा विद्युत पुरवठा खंडित झाला त्यामुळे सकाळपासूनच डोणगाव शहरातील काही भागात वीज पुरवठा नसल्याने नागरिकांची तारांमुळे उडाली असून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी अनिश्चित वेळ लागणार असल्याचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे .

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भिगवण शहरामध्ये दहीहंडीचा उत्सव शिगेला..! भिगवण शहरामध्ये दहीहंडीचा उत्सव शिगेला..!
आधुनिक केसरी न्यूज निलेश मोरे भिगवण : दि.१७ भिगवण शहरात सर्वत्र दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. यंदा गोविंदा पथकांना...
सततच्या पावसामुळे  मुंबई नागपूर महामार्गावरील कांचनगंगा नदीला पूर आल्याने 3 तास वाहतुक झाली ठप्प..!
स्कूल व्हॅन पुरात वाहून गेल्याने चालकाचा मृत्यू..!
कोठारी पुलालगत चा रस्ता खचला; प्रतीक केराम यांचे कंत्राटदारास रस्ता दुरुस्तीचे निर्देश
पावसाचा हाहाकार...! किनवट शहरासह परिसर ही जलमय  स्कूल बस गेली वाहून तर गोशाळेतील अनेक गाय वासरांचा मृत्यू
गणेश राठोड यांची एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड..!
मी पैठणकर म्हणून सर्वांनी एकत्र यावे कुंभमेळ्याच्या बैठकीत आमदार भुमरे यांचे आवाहन