स्कूल व्हॅन पुरात वाहून गेल्याने चालकाचा मृत्यू..!
आधुनिक केसरी न्यूज
लक्ष्मीकांत मुंडे
किनवट : बोधडी ते शिंदगी जाताना रस्त्यातील पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने स्कूलव्हॅन वाहून गेल्याने चालकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. १६) सकाळी दहाला घडली.. प्रेमसिंग मोहन पवार (वय ४०, रा. सिंदगी, ता. किनवट) असे मृत चालकाचे नाव आहे. विशेष म्हणजे पावसामुळे शाळेला सुटी दिल्याने मोठा अनर्थ टळला. मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी शनिवारी सकाळी प्रेमसिंग पवार हे सिंदगीहून बोधडीकडे गेले. त्यावेळी त्यांना पावसामुळे शाळेला सुटी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ते रिकामी स्कूलव्हॅन घेऊन परत गावी सिंदगी येथे जात होते. दरम्यान, रस्त्यातील पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातून त्यांनी स्कूलव्हॅन नेली. परंतु, अंदाज न आल्याने स्कूलव्हॅन पुराच्या पाण्यात वाहू लागली. काही अंतरावर स्कूलव्हॅन झाडात अडकली. परंतु, प्रेमसिंग पवार पुरात वाहून गेले. ही बाब लक्षात येताच परिसरातील लोकांनी आणि महसूल अधिकाऱ्यांनी शोधमोहीम राबवली. घटनास्थळापासून काही अंतरावर त्यांचा मृतदेहच हाती लागला, अशी माहिती मंडळ अधिकारी गाडे यांनी दिली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List