लोढा व अदानींच्या मुंबईतील इमारतीमध्येच आदर्श कबुतरखाना उभारा: हर्षवर्धन सपकाळ

कबूतरखाना वादामागे भाजपा युती सरकारच, ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न

लोढा व अदानींच्या मुंबईतील इमारतीमध्येच आदर्श कबुतरखाना उभारा: हर्षवर्धन सपकाळ

आधुनिक केसरी न्यूज

मुंबई, दि. ६ ऑगस्ट २०२५ मुंबईच्या दादर येथील

कबुतरखान्यावरून वाद सुरु असून यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. लोढा यांच्याकडे मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात जमिनी व मोठ्या इमारतीही आहेत. तसेच सरकारने अदानीला मुंबईतील ३३ टक्के जमीन दिलेली आहे. लोढा व अदानी यांनी त्यांच्या जागेतच एक आदर्श कबूतरखाना उभारून करुणेचा नवा आदर्श घालून द्यावा असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

कबूतरांच्या मुद्द्यावरून भाजपा युती सरकारचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कबुतरांमुळे फुप्फुसाचे गंभीर आजार होत असल्याचे निदर्शनास आल्यावरून न्यायालयाने ते हटवण्याचे आदेश दिलेले आहेत. पण हे कबुतरखाने हटवू नका अशी मागणी जैन समाजातून होत आहे. नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पण सरकार जाणीवपूर्वक अशा वादाला खतपाणी घालत आहे. भाजपा युती सरकारचे काम म्हणजे आजारापेक्षा उपचार भयंकर असे आहे. राज्यात शेतकरी संकटात आहे, तरुण मुलामुलींना नोकऱ्या नाहीत, महागाई प्रचंड वाढलेली आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सरकारच असे वाद उकरून काढत आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, दादरच्या कबुतरखाना येथे झालेल्या आंदोलनात बाहेरचे लोक होते असे सांगितले जात आहे पण हा सुद्धा बनाव आहे. राज्यात कोठेही काहीही घटना घडली की बाहेरच्या लोकांनी ती घडवून आणली हे ठोकळेबाज उत्तर देऊन सरकार आपले अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असते, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

डबल इंजिन सरकार की डबल गँगवॉर?
बेस्ट प्रशासनाचा अतिरिक्त कारभार एकनाथ शिंदे यांनी अश्विनी जोशी यांच्याकडे दिला तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आशिष शर्मा यांची नियुक्ती केली यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अधिका-यांच्या बदल्यांवरून गॅंगवार सुरु आहे. एका पदासाठी, एकाच दिवशी फडणवीस व शिंदे यांनी दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या  आहेत. मलाईदार पदावर ‘आपलाच माणूस’ बसविण्यासाठी सुरु असलेला हा संघर्ष पाहता सरकार आहे की टोळीयुद्ध असा प्रश्न जनतेला पडला आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

दरोड्यात सहभागी तिघे अट्टल गुन्हेगार अटकेत देऊळगाव राजात स्था.गुन्हे शाखेची सिनेस्टाईल कारवाई..! दरोड्यात सहभागी तिघे अट्टल गुन्हेगार अटकेत देऊळगाव राजात स्था.गुन्हे शाखेची सिनेस्टाईल कारवाई..!
आधुनिक केसरी न्यूज देऊळगाव राजा : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर सह इतर ठिकाणी दरोडा,घरफोड्या, दुचाकी चोरी अशा विविध गुन्ह्यात पोलिसांना हवे...
मुरबाड तालुक्यातील तळ्याची वाडी येथे बिबट्याचा वावर,नागरिकांनी काळजी घ्यावी घाबरून जाऊ नये - सुरेश बांगर
लोढा व अदानींच्या मुंबईतील इमारतीमध्येच आदर्श कबुतरखाना उभारा: हर्षवर्धन सपकाळ
शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी हाती बांधले घड्याळ;अजितदादा पवारांनी केले स्वागत..!
भाजपचे राजू जाजूर्ले यांच्यावर हल्ला एकार्जुना चौकातील घटना
चिमूर चंद्रपूर बस उलटली सहा गंभीर, 12 प्रवासी किरकोळ जखमी, वाहक दगावला.
मुदखेड मध्ये कुरेशी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा..!