मुरबाड तालुक्यातील तळ्याची वाडी येथे बिबट्याचा वावर,नागरिकांनी काळजी घ्यावी घाबरून जाऊ नये - सुरेश बांगर
आधुनिक केसरी न्यूज
शंकर करडे
मुरबाड : तालुक्यातील तळ्याची वाडी येथे बिबट्या आल्याची घटना तेथील आदिवासी बांधवांनी सांगितले पुढे त्यांनी सांगितले की वाडीतील घराच्या समोर असणारे दोन ते तीन कोंबड्या वर हल्ला करून बिबट्या त्यांना घेऊन जंगलात पसार झाला वाडीतील सर्व आदिवासी बांधव लहान मुले भयभीत झाली होती ही घटना समजतात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर यांनी तात्काळ तेथे भेट देऊन मुरबाड वन विभागाला कळवले व वाडीतील सर्व आदिवासी बांधवांना धीर दिला व काळजी घेण्यास सांगितले गरज भासल्यास संपर्क साधा असेही त्यांनी सांगितले
शिरवली विभागाचे वनपाल घोडके यांनी तळ्याचे वाडी येथे जाऊन तेथील पाहणी केली त्यांच्या सोबत घोलप दादा नारीवलीचे वनपाल घुडे यांनी देखील संपूर्ण परिसर जंगलामध्ये जाऊन रात्री आठ वाजेपर्यंत पाहणी केली त्यानंतर त्यांनी आदिवासी बांधवांना बिबट्या आल्यानंतर कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले व जर बिबट्या आला तर फटाके वाजवण्यासाठी दिले म्हणजे बिबट्या पळून जाईल आवश्यकता भासल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा देखील लावण्यात येईल अशा प्रकारचा धीर वनपाल घोडके यांनी दिला
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List