डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना पुणे शहर च्या वतीने निषेध आंदोलन. 

पोलिसांकडून दिलगिरी व्यक्त अनावधानाने प्रकार घडल्याची कबुली

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना पुणे शहर च्या वतीने निषेध आंदोलन. 

आधुनिक केसरी न्यूज

रोहित दळवी 

पुणे : दि.28 वार्तांकन करत असताना काळेपडळ हडपसर परिसरात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पुणे शहर सरचिटणीस दिनेश वढणे यांच्याशी झालेल्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ संघटनेने ठाम भूमिका घेतल्यानंतर अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि डीबी कर्मचारी अतुल यांनी याबाबत जाहीर माफी मागितली आहे. संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या प्रतिनिधींनी अध्यक्ष महेश टेळे,कार्याध्यक्ष विजय रणदिवे, संपर्क प्रमुख लहू पारवे, उपाध्यक्ष नागेश होणमाने, कार्यकारणी सदस्य अमित मुंडिक, खंडागळे,पराग सर, मुकेश वाडकर आणि दिनेश वढणे आदी काळेपडळ पोलीस स्टेशन येथे भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.या चर्चेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी स्पष्टपणे सांगितले की  हा प्रकार अनावधानाने घडला असून याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.तसेच त्यांनी यापुढे डिजिटल मीडियाच्या पत्रकारांवर असा प्रकार पुन्हा घडणार नाही असेही स्पष्ट आश्वासन दिले. यावेळी उपस्थित डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या सभासदांनी हाताला काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन केले. व पोलिसांना निवेदन दिले. ही घटना पत्रकार एकतेचे प्रतिक ठरली असून पत्रकारांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी संघटना कटिबद्ध आहे.अशी ग्वाही महेश टेळे यांनी आंदोलना दरम्यान दिली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मोखाड्यात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने कृषीमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन. मोखाड्यात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने कृषीमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन.
आधुनिक केसरी न्यूज तेजस रोकडे  मोखाडा : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन जंगली रमी खेळताना चा...
उद्धव ठाकरेंचा वाढदिवस मांजरीत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा 
उत्सवांच्या काळामध्ये डीजे चा दणदणाट सहन केला जाणार नाही; पोलीस अधीक्षक संदीप घुगेंची मंडळांना तंबी
रेल्वे च्या अपुऱ्या कामाबाबत 'जनसुराज्य' चे समित कदम यांनी घेतली केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट दिले निवेदन
कीर्तन महोत्सव समितीतर्फे जेष्ठ नागरिक विजयकुमार गोखले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना पुणे शहर च्या वतीने निषेध आंदोलन. 
आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाचा मयुरेश कोळी याचा डंका ; भूतानमध्ये पटकावले दोन रौप्यपदक