अकोला आणि हिंगोलीतील प्रहार,वंचित आणि उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश..!

अकोला आणि हिंगोलीतील प्रहार,वंचित आणि उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश..!

आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : दि.२९ जुलै अकोला जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती आणि वंचित आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व हिंगोलीतील माजी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला.आमदार अमोल मिटकरी यांच्या नेतृत्वाखाली वंचित आणि प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी तर वसमतचे आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वाखाली वसमत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी आज प्रवेश केला.

यामध्ये प्रहारचे अकोला उपजिल्हाप्रमुख अरविंद पाटील, पातुर तालुकाप्रमुख सतिश नेहवाल, बाळापूर युवक तालुकाध्यक्ष भूषण पारसकर आदींसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी तर वसमत नगर परिषदेमधील नगराध्यक्ष वैजनाथ गुंडाळे, उबाठा गटाचे गटनेता दिलीप हाळवे पाटील, नगरसेवक धनंजय गोरे, वसंत चेपुरवार आदींसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, आमदार राजू नवघरे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मोखाड्यात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने कृषीमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन. मोखाड्यात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने कृषीमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन.
आधुनिक केसरी न्यूज तेजस रोकडे  मोखाडा : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन जंगली रमी खेळताना चा...
उद्धव ठाकरेंचा वाढदिवस मांजरीत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा 
उत्सवांच्या काळामध्ये डीजे चा दणदणाट सहन केला जाणार नाही; पोलीस अधीक्षक संदीप घुगेंची मंडळांना तंबी
रेल्वे च्या अपुऱ्या कामाबाबत 'जनसुराज्य' चे समित कदम यांनी घेतली केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट दिले निवेदन
कीर्तन महोत्सव समितीतर्फे जेष्ठ नागरिक विजयकुमार गोखले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना पुणे शहर च्या वतीने निषेध आंदोलन. 
आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाचा मयुरेश कोळी याचा डंका ; भूतानमध्ये पटकावले दोन रौप्यपदक