उत्सवांच्या काळामध्ये डीजे चा दणदणाट सहन केला जाणार नाही; पोलीस अधीक्षक संदीप घुगेंची मंडळांना तंबी
आधुनिक केसरी न्यूज
सुधीर गोखले
सांगली : सर्वानाच ज्या उत्सवाची आतुरता असते असा सर्वांचाच श्री गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने गणेश मंडळांच्या बैठका घेऊन आरोग्यास हानिकारक अशा डी जे ला यंदा फाटा देऊन सामाजिक कार्यसाठी हा निधी वळवण्याचे आवाहन सुरु केले आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने गणेश मंडळे आणि साऊंड सिस्टीमचे मालक यांची बैठक घेऊन डी जे च्या आवाजावर मर्यादा ठेवण्याचे आवाहन केले आहे अन्यथा जागेवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. तसेच बीभत्स गाणी लेसर चा वापर यावरही कठोर कारवाई चे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या डी जे चा दणदणाट किंवा लेसर चा वापर झाल्यास तात्काळ कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यंदा चा गणेशोत्सव हा डी जे मुक्त करण्याबरोबरच सामाजिक सलोखा सांभाळून साजरा होण्याबाबत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्व विभागीय पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपापल्या विभागातील गणेश मंडळे आणि डॉल्बी मालक यांची बैठक घेऊन आवाजावरील मर्यादेबाबत सूचना दिल्या आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List