नाथसागराचे १८ दरवाजे उघडले ; पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
आधुनिक केसरी न्यूज
दादासाहेब घोडके
पैठण: जायकवाडी धरणाची पाणी पातळी ३१ जुलै रोजी ९१% टक्यावर पोहचली. ३१ जुलै गुरवार रोजी दुपारी ६ वाजे दरम्यान जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात 9432 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आला. जायकवाडी धरणाचे एकूण 18 दरवाजे प्रत्येकी 0.5 फुटाने उघडण्यात आले असुन एकूण 9432 cusecs विसर्ग सुरु करण्यात आला असुन धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तरी कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये या करिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, ही विनंती.
नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे. आशे कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथनगर (ऊ) पैठण यांनी अवाहन केले आहे. दरम्यान गुरुवारी नाथसागराचे जलपुजन जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विघे यांच्या हस्ते करण्यात आले आसुन यावेळी पैठणचे आमदार विलासबाप्पु भुमरे,आमदार रमेश बोरणारे,आमदार विजयसिंह पंडीत,आमदार हिकमत उढाण,विठ्ठल लंघे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,SDm निलम बाफना,तहसीलदार ज्योती पवार, सुनंदा जगताप,मुख्य अभियंता ,आरुण नाईक,मुख्य अभियंता,राजीव मुंदडा,मुख्य अभियंता,संतोष तिमनवार,कार्यकारी संचालक, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, प्रशांत जगदाळे लक्ष्मण औटे,किशोर तावरे,सह शेतकरी, भाजप,शिवसेना पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी शेतकऱ्यांनी संत एकनाथ साखर कारखान्याकडे ऊसाचे आसलेले पैसे मिळावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांच्या सह शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शेतकऱ्यांना अश्वासन देवु केले यावेळी आमदार विलासबाप्पु भुमरे यांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांना पंधरा दिवसांत पैसे मिळावेत म्हणून प्रयत्न करून नक्कीच न्याय मिळवुन देवु.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List