पलूस येथे बनावट सोने गहाण ठेवून स्टेट बँकेची फसवणूक,सहकार क्षेत्रात खळबळ..!
साडेसात लाखांची फसवणूक : तिघांवर फसवणूकीचा गुन्हा
आधुनिक केसरी न्यूज
दिनेश कांबळे
पलूस : स्वतःच्या व कर्जदाराच्या फायद्यासाठी तिघांनी संगणमत करून पलूस येथील स्टेट बँक फ इंडिया बँकेत बनावट प्रमाणपत्र व बनावट सोने तारण देऊन, त्याव्दारे घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता तिघांनी बँकेची सात लाख साठ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पलूस पोलीस ठाण्यात बँकेच्या अधिकाऱ्यांनी तिघाविरूध्द फिर्याद दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, पलूस येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पलूस येथे दि. २५ मे २०१५ ते १६ मे २०२५ या कालावधीत राजेंद्र विठ्ठलराव यादव (रा. रामापूर ता. कडेगाव), राजेंद्र कुमार संपतराव शिंदे (रा. पलूस) व सुधाकर शिवाजी सुर्यवंशी ( ऑरा. पलूस) यांनी संगणमत करून स्वतःच्या व कर्जदार याच्या फायद्यासाठी २०४.१३ ग्रॅम वजणाचे बनावट सोन्याचे दागिणे खरे असल्याचे प्रमाणपत्र दिले.त्याव्दारे कर्जदार यांनी सात लाख साठ हजार रूपये कर्ज घेतले. ते कर्ज न फेडता बँकेची फसवणूक केली असल्याची फिर्याद बँक अधिकारी गोरख मच्छिंद्र पाखरे (४०, रा. परांजपे कॉलनी, पलूस) यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.
तिघांवर पलूस पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पलूस व शहर परिसरात खळबळ उडाली असून सहकार क्षेत्रात याची चर्चा सुरू आहे. बँकेने सोने तारण कर्ज सुविधा सुलभ केली असल्याने अनेक ग्राहक सोने तारण कर्ज प्रकरण करतात.त्यासाठी सोने खरे की खोटे हे पाहण्यासाठी बँकेच्या वतीने व्हॅल्युटर नेमण्यात आलेला असतो. त्याच्या प्रमाणपत्रानंतरच बँक सोन्यावर कर्ज पुरवठा करत असते. मात्र प्रमाणपत्र देणाराच यामध्ये सामिल झाल्याने सदरची बाब बँकेच्या तात्काळ निदर्शनास आली नाही असा अंदाज व्यक्त केला जात आहे.या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ माजली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List