आ.डॉ.संजय कुटे यांना मातृ शोक, उर्मिला कुटे यांचे दुःखद निधन
आधुनिक केसरी न्यूज
शेगाव : दि.१ जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ.संजय कुटे यांच्या आई उर्मिला श्रीराम कुटे यांचे आज दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ४ वाजता चे सुमारास त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलं, चार सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. श्रीमती उर्मिला कुटे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना कष्ट, स्वाभिमान आणि मूल्यांची शिकवण देत घडवले. त्यांच्या या संस्कारांची शिदोरी आज डॉ.संजय कुटे यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत मोलाची ठरत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज, संध्याकाळी ४ वाजता जळगाव जामोद येथील स्मशानभूमीत जड अंतःकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले . आ.डॉ. कुटे यांच्या आईच्या निधनाने कुटे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, जळगाव जामोद मतदारसंघात हळहळ व्यक्त केली जात आहे. विविध राजकीय, सामाजिक, व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List