भिगवण येथून २७ वर्षीय तरुण युवक बेपत्ता!
आधुनिक केसरी न्यूज
निलेश मोरे
भिगवण : दि.१ इंदापूर तालुक्यातील भिगवण-स्टेशन येथील शक्ती सुधाकर खडके (वय-२७ वर्षे) हा बुधवार (दि.३०) पासून घरी काहीही न एक सांगता बेपत्ता झाला आहे. या संदर्भात भिगवण पोलीस ठाण्यात सुधाकर प्रल्हाद खडके (वय-५७ वर्ष धंदा-मजुरी रा-भिगवन स्टेशन, ता-इंदापुर जि-पुणे) बेपत्ता झाल्याची नोंद दाखल केली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, भिगवण ग्रामपंचायतच्या हद्दीतील भिगवण-स्टेशन येथे राहणारा शक्ती खडके हा तरुण बुधवार (दि.३०) रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून राहत्या घरातून कोणाला काहीही न एक सांगता गायब झाला आहे. घरातील सदस्यांनी व नातेवाईक यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो आढळून आला नाही. म्हणून त्याचे वडील सुधाकर खडके यांनी गुरुवारी (दि.३१) रोजी दुपारी दोन वाजता भिगवण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.बेपत्ता तरुणाचे वर्णन अंगात नेसनिस चेक्सचा निळ्या लाल रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, निळ्या रंगाची जिन्स, उंची ५ फुट ९ इंच, केस काळे, बांधा-सडपातळ, रंग गोरा, पायात चप्पल, भाषा मराठी इंग्रजी हिंदी बोलतो. दरम्यान, सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अन्सार शेख हे करीत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List