मिनी ट्रकने धडक दिल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू

मिनी ट्रकने धडक दिल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू

आधुनिक केसरी न्यूज
 
गोंदिया : अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बोडगाव देवी मार्गावर २५ जुलै रोजी संध्याकाळी एका दुचाकी चालकाचा मिनी ट्रकने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. मृत तरुणाचे नाव बोडगाव देवी निवासी सुमेध जयदेव रामटेके (वय २७) असे या आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमेध रामटेके शुक्रवारी त्यांच्या मोटारसायकल क्रमांक एमएच ३५ एपी ४८५३ वर अर्जुनी मोरगाव येथे गेले होते. संध्याकाळी ते गावी परत येत असताना बोंडगाव देवीजवळ एमएच ३१, एम ८०६३ क्रमांकाच्या मिनी ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या घटनेत सुमेध गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत रस्त्यावरच पडला होता. तेथून जाणाऱ्या नागरिकांनी हे पाहताच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला बोलावले. यानंतर, जखमी सुमेधला ग्रामीण रुग्णालयात अर्जुनी मोर येथे दाखल करण्यात आले आणि प्राथमिक उपचारानंतर त्याला गोंदिया येथे रेफर करण्यात आले, जिथे त्या तरुणाचा मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

छत्रपती संभाजीनगर मध्ये गुन्हेगारीचा कहर! मोटारसायकल, मोबाईल लंपास ; चोरट्याना कुठेय पोलिसांचा धाक  छत्रपती संभाजीनगर मध्ये गुन्हेगारीचा कहर! मोटारसायकल, मोबाईल लंपास ; चोरट्याना कुठेय पोलिसांचा धाक 
आधुनिक केसरी न्यूज छत्रपती संभाजी नगर : आकाशवाणी सिग्नल येथे दि.२४ रोजी सकाळी ८ वाजता सृष्टी दिनेशराव सुरकार जॉब वर...
गारखेडा कारगिल उद्यानात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा
गोंदियात पावसाचे थैमान जिल्हा प्रशासन अलर्ट  जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर
मिनी ट्रकने धडक दिल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू
गोव्यातील ICAR-CCARI संस्थेला देशातील सर्वोच्च कृषी सन्मान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन
25 जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
एसटी व मोटरसायकलच्या अपघातात महिला ठार