वरोडा नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या

शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांची मागणी ; पमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले निवेदन

वरोडा नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या

आधुनिक केसरी न्यूज

वरोडा : सध्या वरोडा नगर परिषदेत मुख्याधिकाऱ्याचे पद  रिक्त असून त्या ठिकाणी भद्रावती नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. मात्र, दोन्ही नगर परिषदांच्या कामाचा ताण वाढल्यामुळे मुख्याधिकारी वरोडा येथे नियमित उपस्थितपणे राहू शकत नाहीत. परिणामी, नागरिकांच्या नागरी सुविधा आणि पायाभूत विकासाच्या कामांवर परिणाम होत आहे.

वरोडा शहरातील स्वच्छता, नाले व सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, रस्ते, आणि इतर नागरी सुविधा यासारख्या क्षेत्रांमध्ये नागरिकांना वेळेवर सेवा मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता, वरोडा नगर परिषदेकरिता एक पूर्णवेळ व नियुक्त मुख्याधिकारी असणे अत्यावश्यक ठरत आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करून वरोडा नगर परिषदेस कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्याची मागणी केली आहे. संबंधित विभागाने तातडीने निर्णय घेऊन वरोडावासीयांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गोव्यातील ICAR-CCARI संस्थेला देशातील सर्वोच्च कृषी सन्मान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन गोव्यातील ICAR-CCARI संस्थेला देशातील सर्वोच्च कृषी सन्मान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन
आधुनिक केसरी न्यूज पणजी : २४ जुलै २०२५: गोव्यातील आघाडीची कृषी संशोधन संस्था ICAR–सेंटरल कोस्टल अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (CCARI) हिला...
25 जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
एसटी व मोटरसायकलच्या अपघातात महिला ठार
25-26 जुलै दरम्यान विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज,चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट
मित्राच्या घरून परततांना शिक्षकाचा पुरात वाहून मृत्यू अन गावावर शोककळा...!
वरोडा नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या
कुंभार पिंपळगावात सराफा दुकानावर चोरट्यांचा डल्ला,लाखो रूपयांचे दागिने लंपास चोरटे जोमात; पोलिस प्रशासन कोमात