देगलूर पोलिसांचा दमदार कामगिरी; अवैध गुटखा वाहतूक करणारे दोघे गजाआड, ₹14.88 लाखांचा मुद्देमाल जप्त.
आधुनिक केसरी न्यूज
देगलूर : पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत आणखी एक धाडसी कारवाई करत अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली असून तब्बल ₹14 लाख 88 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 21 जुलै रोजी लखा फाटा बसस्टॉप परिसरात गोपनीय माहितीनुसार करण्यात आली. बोलेरो जिप (MH 28 AZ 0202) ची झडती घेतल्यावर विविध कंपनीच्या गुटखा, पान मसाला आणि तंबाखूचा प्रचंड साठा आढळून आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत पो.हे.का. कृष्णा तलवारे, पो.का. वैजनाथ मोटरगे, पो.का. राजवंतसिंध बंगई, पो.का. साहेबराव सगरोळीकर, पो.का. रणजित मुदीराज, पो.का. नामदेव मोरे व पो.का. अहमद बेग यांनी विशेष मेहनत घेतली. अटक करण्यात आलेले आरोपी शेख आफताब शेख गुलाब (वय 25, रा. आजम कॉलनी, हिंगोली) आणि शोएब खान शरिफ खान (वय 31, रा. आजम कॉलनी, हिंगोली) हे स्वतःच्या फायद्यासाठी गुटखा वाहतूक करत असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. जप्त मुद्देमालामध्ये विमल पान मसाला, केसरयुक्त विमल पान मसाला, V-1 बिट टोबॅको यासह अंदाजे नऊ लाख रुपये किंमतीचे बोलेरो वाहन सामाविष्ट आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 379/2025 अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी पोलीस निरीक्षक मारोती मुंडे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचे कौतुक केले असून, देगलूर पोलीस दलाच्या दक्षतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List