गोंदियात पावसाचे थैमान जिल्हा प्रशासन अलर्ट  जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

आधुनिक केसरी न्यूज

गोंदिया :  25 जुलै च्या मध्यरात्रीपासूनच  मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या जोर बघता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. एकीकडे बळीराजा सुखावला आहे तर दुसरीकडे शहरात मात्र अनेक ठिकाणी तुडुंब पाणी भरल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. चाकरमान्यांना सकाळी आपल्या कामावर जाताना पावसाचा सामना करावा लागला. पाऊस अधिक असल्याने शेतकऱ्यांनी धनाची ऋणी बंद केली आहे. जिल्ह्यातील नदी नाले उसळून वाहत आहेत. आजच्या  मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा गोंदिया नगरपरिषद व जिल्हा सामान्य रुग्णालयाचा  गलथान पणा समोर आला आहे जिल्हा महिला रुग्णालयात पाणी साचल्यामुळे साथीच्या आजारांना आमंत्रण दिले जात आहे. तर दुसरीकडे शहरातील रेल्वे अंडरग्राउंड मार्ग संपूर्ण पाण्याने वाहून जात असल्याने मार्ग बंद करण्यात आलेला आहे. एकंदरीत मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगले झोडपून काढले आहे.मुसळधार पाऊस सुरू असून सध्या तरी कोणतीही घटना झालेली नाही

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

छत्रपती संभाजीनगर मध्ये गुन्हेगारीचा कहर! मोटारसायकल, मोबाईल लंपास ; चोरट्याना कुठेय पोलिसांचा धाक  छत्रपती संभाजीनगर मध्ये गुन्हेगारीचा कहर! मोटारसायकल, मोबाईल लंपास ; चोरट्याना कुठेय पोलिसांचा धाक 
आधुनिक केसरी न्यूज छत्रपती संभाजी नगर : आकाशवाणी सिग्नल येथे दि.२४ रोजी सकाळी ८ वाजता सृष्टी दिनेशराव सुरकार जॉब वर...
गारखेडा कारगिल उद्यानात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा
गोंदियात पावसाचे थैमान जिल्हा प्रशासन अलर्ट  जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर
मिनी ट्रकने धडक दिल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू
गोव्यातील ICAR-CCARI संस्थेला देशातील सर्वोच्च कृषी सन्मान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन
25 जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
एसटी व मोटरसायकलच्या अपघातात महिला ठार