भाजपचे राजू जाजूर्ले यांच्यावर हल्ला एकार्जुना चौकातील घटना
आधुनिक केसरी न्यूज
वरोडा : दि.५/८/२०२५ भाजपचे सक्रिय कार्यकर्ते राजा जाजूर्ले यांचेवर काही अज्ञात युवकांनी हल्ला करून त्यांना मारहाण केल्याची घटना घडली.भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते व 'एम एच ३४' व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन राजू जाजूर्ले हे येथील एकार्जूना चौकात आपल्या मित्रांसोबत बसून चर्चा करीत असताना यांच्यावर ८ ते १० अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. ही घटना दोन ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराला घडली.
राजू जाजूर्ले हे निर्भीड व्यक्तिमत्त्वाचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ते राजकीय घटनांवर आपली सडेतोड मते मांडत असतात. घटनेत जाजूर्ले यांना घेराव घालून जोरदार मारहाण करण्यात आली.घटनेची तक्रार पूर्णपणे स्टेशनला करण्यात आली असून आपण हल्लेखोरांना ओळखत नसल्याचे त्यांनी पोलिसांना तक्रारीत म्हटले आहे.
एकार्जुना चौकात त्यांचे मित्र सपन डे यांच्यासोबत बसून असताना अचानकपणे अनोळख्या युवकांनी घेराव घालून त्यांचेवर हल्ला केला व घटनास्थळावरून हल्लेखोरांनी पलायन केले. आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संदिग्ध युवक कैद असल्याची माहिती प्राप्त झाली असून वरोरा पोलिस त्या दिशेने तपास करीत आहे. वरोडा पोलीस स्टेशनमध्ये जाजूर्ले यांनी तक्रार दाखल केली असून पोलिस घटनेच्या मागचा हेतू आणि हल्लेखोरांची ओळख शोध घ्यावा अशी मागणी केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, *"या मारहाणीमागे राजकीय किंवा सामाजिक कारण व्यतिरिक्त अन्य दुसरे कोणते कारण तर नाही ना "* अशी शंका व्यक्त केली जात आहे, कारण जाजूर्ले सोशल मीडियावर निर्भीडपणे विचार मांडतात. तथापि, अद्याप घटनेचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List